Winter Care Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Winter Care: हिवाळ्यात घरातील रोपांची काळजी घेण्यासाठी फॉलो करा 'या' पाच टिप्स

हिवाळ्यात झाडांची योग्य काळजी घेतल्यास झाड चांगले राहतात.

Puja Bonkile

Winter Care: हिवाळा सुरू होताच लाइफस्टाइलमध्ये अनेक बदल होतात. कपड्यांमध्ये आणि खाण्याच्या सवयींमध्ये देखील बदल होतो. पण घरातील रोपांकडे लक्ष देत नाहीत. थंडीच्या दिवसात तुम्ही तुमच्या घरातील रोपांवरही तितकेच लक्ष दिले पाहिजे. हवामानात बदल होत असताना रोपांच्या गरजाही बदलत असतात. त्यांची काळजी घेण्याच्या पद्धतीतही बदल केला पाहिजे.

जर तुम्हीही तुमच्या घरात झाडे ठेवलीत तर थंडीत ती कधीच कोमेजून जाऊ नयेत असे तुम्हाला वाटत असेल तर पुढील टिप्स फॉलो कराव्यात.

  • सुर्यप्रकाश

हिवाळ्यात तुमच्या झाडांना आवश्यक तेवढा सूर्यप्रकाश मिळत नाही. त्यामुळे झाडे सुकतात. यामुळे आपण सुर्यप्रकाश वाढविण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. या दिवसांमध्ये तुमच्या घरातील रोपांना त्यांच्या गरजेनुसार पुरेसा प्रकाश मिळत आहे की नाही तपासावे. हिवाळ्यात अधिक प्रकाश देण्यासाठी झाडे खिडकीजवळ ठेवावी.   

  • तापमानावर लक्ष ठेवा 

थंडीच्या दिवसात तापमानात होणारे बदल काही प्रमाणात घरातील रोपांना हानी पोहोचवू शकतात. घरात खिडक्या आणि समोरचे दरवाजे उघडण्याव्यतिरिक्त आपल्या वनस्पतींना हीटिंग युनिट्स आणि रेडिएटर्सपासून दूर ठेवावे.  

  • योग्यप्रमाणात पाणी

थंड हवामानात तुमच्या घरातील रोपांची पाण्याची गरज तुलनेने कमी असते. कारण ते अधिक हळूहळू वाढतात आणि कमी पाणी शोषून घेतात. अशावेळी झाडाला पाणी देण्यापूर्वी जमिनीत एक इंच बोट घालून जमिनीतील आर्द्रता तपासावी. जमिनीचा वरचा एक इंच कोरडा वाटला तरच पाणी द्यावे. सामान्यत: थंडीच्या दिवसात झाडाची मुळे जास्त पाण्यामुळे कुजतात. याशिवाय झाडांना दिलेले पाणीही कमी करावे.

  • खताचा वापर कमी करावा

रोपांसाठी खत वापरणे चांगले मानले जाते. त्यामुळे त्यांची वाढ होण्यास मदत होते. परंतु थंडीच्या दिवसात खताचा वापर कमी करावा. कारण या हंगामात झाडांची वाढ मोठ्या प्रमाणात कमी होते.

  • आर्द्रता राखणे

तुम्ही कदाचित याकडे कधी लक्ष दिले नसेल. पण थंडीच्या दिवसात हीटर्स सतत चालवल्यामुळे घरातील आर्द्रतेची पातळी खूपच कमी होते. हे तुमच्या घरातील रोपांसाठी हानिकारक असू शकते. विशेषतः जर आपल्या रोपाला जास्त आर्द्रता आवश्यक असेल. अशावेळी खोलीत ह्युमिडिफायर वापरण्याचा सल्ला दिला जातो. जर तुम्ही हे करू शकत नसाल तर तुमच्या झाडांजवळ पाण्याने भरलेला ट्रे ठेवावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Waste Management: कचरा व्यवस्थापनाचे नियम पाळा, अन्यथा कारवाईची शक्यता; 385 घटकांवर प्रशासनाची नजर

Morjim School Repair News: महिना उलटूनही शाळेची दुरुस्ती रखडली; अंगणवाडी स्टेजवर, बालहक्क आयोगाची नाराजी

Morjim Beach Safety: मोरजी बीचवर गुरांचे कळप, भटक्या श्वानांचा उपद्रव; पर्यटन हंगामात पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न!

Ranji Trophy: गोव्याची फलंदाजी ठरतेय डोकेदुखी; विदर्भाविरुद्ध पराभवांची मालिका खंडित करण्याचे आव्हान

Rohit Sharma Dance Video: 'ले गई, ले गई' गाण्यावर रोहित शर्मानं धरला ठेका! करिश्मा कपूरसोबतचा डान्स व्हिडीओ व्हायरल; हिटमॅन म्हणाला, 'मजा आ गया'

SCROLL FOR NEXT