Winter Care Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Winter Care Tips: आंघोळ करताना लक्षात ठेवा 'ही' गोष्ट, अन्यथा फुटू शकते मेंदूची नस

जर तुमची रोगप्रतिकारशक्ती कमी असेल तर हिवाळ्यात थंड पाण्याने आंघोळ करणे टाळावे.

Puja Bonkile

Winter Care Tips: थंडीच्या दिवसांमध्ये आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असते. अनेक लोकांना थंड पाण्याने आंघोळ करण्याची सवय असते. पण हिवाळ्यात असे करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. यामुळे कोणत्या लोकांनी हिवाळ्यात थंड पाण्याने आंघोळ करू नये हे जाणून घेऊया.

रक्तवाहिनी फुटू शकते

हिवाळ्यात आपल्याला ब्रेन स्ट्रोकच्या अधिक घटना ऐकायला मिळतात. थंडीच्या महिन्यांत आपले रक्त घट्ट होते आणि रक्तवाहिन्या तात्पुरत्या संकुचित होतात. ज्यामुळे रक्तदाब वाढू शकतो. रक्तवाहिन्या फुटू शकतात आणि मेंदूमध्ये रक्तस्त्राव होऊ शकतो. यामुळे अपंगत्व येऊ शकते आणि ते प्राणघातक देखील असू शकते.

शरीराला झटका बसतो

थंड पाण्याने आंघोळ केल्याने शरीराला झटका बसतो आणि त्वचेतील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. ज्यामुळे तुमच्या शरीरातील रक्त प्रवाह कमी होतो. परिणामी, मेंदूसह संपूर्ण शरीरात रक्त पंप करण्यास सक्षम होण्यासाठी हृदय कठोरपणे कार्य करते आणि जोराने धडधडते.

  • ब्रेन स्ट्रोक

हिवाळ्यात थंड पाण्याने आंघोळ करणे अधिक धोकादायक असू शकते.कारण यामुळे ब्रेन स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. थंड पाण्यात आंघोळ केल्याने शरीराचे मध्यवर्ती तापमान कमी होते आणि एकूण परिधीय धमनीचा प्रतिकार वाढतो. ज्यामुळे धमनीमध्ये रक्तदाब वाढतो. ज्यामुळे मेंदूचा झटका येतो. हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी अचानक थंड पाण्याने आंघोळ करणे धोकाादायत ठरू शकते.

  • हिवाळ्यात स्वतःला उबदार ठेवण्यासाठी पुढील गोष्टी कराव्या

  1. आंघोळीसाठी नेहमी कोमट पाणी वापरावे.

  2. हिवाळ्यात आंघोळ करताना कधीही पहिले डोक्यावर पाणी टाकू नका. कारण त्यामुळे स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. प्रथम अंगावर, नंतर डोक्यावर पाणी घ्यावे.

  3. नियमित व्यायामामुळे तुमचे शरीर उबदार राहण्यास मदत होते. दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम करावे.

  4. हिवाळ्यात फ्रेश हंगामी फळे आणि हिरव्या भाज्यांचे सेवन करावे.

  5. साखरेचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.

  6. हिवाळ्यात गरम पाण्याने आंघोळ करायची नसेल तर किमान कोमट पाणी घ्यावे. तुम्ही आजारी असाल तर थंड पाण्याने आंघोळ टाळा.

  • या लोकांनी थंड पाण्याने आंघोळ करू नये

मधुमेह, उच्च रक्तदाब, वात, रक्तवहिन्यासंबंधी रोग, हृदयविकाराने ग्रस्त, ब्रेन स्ट्रोक किंवा म्हाताऱ्या लोकांनी थंडीच्या महिन्यांत थंड पाण्याने आंघोळ करणे टाळावे. याशिवाय लठ्ठ किंवा धुम्रपान करणाऱ्या लोकांचाही थंड पाण्याने आंघोळ केल्यास मृत्यू होऊ शकतो. आरोग्य तज्ञांच्या मते हिवाळ्यात थंड पाणी वापरणे धोकादायक ठरू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT