Winter Care Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Winter Care Tips: छातीत दुखतय? असू शकते 'या' गंभीर आजाराचे लक्षण, वेळीच व्हा सावध

हिवाळ्यात खोकला, सर्दी होणे सामान्य आहे. पण कधी कधी छातीत दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका.

Puja Bonkile

Winter Care Tips: हिवाळा सुरू होतात सर्दी,खोकला यासारख्या समस्या निर्माण होतात. पण, कधी कधी हिवाळ्यात छातीत दुखण्याची समस्याही उद्भवू शकते. वास्तविक, लोक याला सर्दीचे सामान्य लक्षण मानतात आणि त्याकडे दुर्लक्ष करतात. छातीत दुखण्याच्या समस्येकडे दुर्लक्ष करू नये, ही अनेक मुख्य कारणांमुळे होऊ शकते. चला जाणून घेऊया बदलत्या हवामानात छातीत दुखण्याची कारणे कोणती आहेत.

छातीत दुखणे या आजारांचे असू शकते लक्षण

  • हृदयविकाराचा झटका

हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. थंड वातावरणात स्नायूंपर्यंत रक्त नीट पोहोचत नाही. तेव्हा स्नायूंना इजा होते. अशावेळी हृदयाच्या स्नायूंनाही इजा होते. त्यामुळे छातीत दुखते. या छातीत दुखण्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो.

  • न्यूमोनियाची लक्षणे

कधीकधी न्यूमोनियामुळे छातीत वेदना होतात. न्यूमोनियामुळे ताप, थंडी आणि श्वास घेण्यास त्रास होतो. न्यूमोनियामध्ये फुफ्फुसांना सूज येते. यामुळे छातीत दुखते.

  • पोटात अल्सर होणे

थंडीच्या दिवसांमध्ये अनेक आजार डोकंवर काढतात. यामध्ये छातीत दुखणे देखील एक समस्या आहे. अल्सरमुळे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या निर्माण होतात. लोक सहसा छातीत दुखणे हे खोकला किंवा सामान्य सर्दीचे लक्षण मानून दुर्लक्ष करतात. पण असे करू नका वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधावा.

  • गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स

हा पोटाशी संबंधित आजार आहे. ही पचनक्रियेशी संबंधित समस्या आहे. त्यामुळे छातीत दुखू शकते. या समस्येमध्ये पोटातील आम्ल अन्ननलिका किंवा अन्ननलिकेपर्यंत पोहोचते. या कारणामुळे छातीत जळजळ आणि वेदना होतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress Crisis: गोव्यात काँग्रेसला पर्याय शोधत विरोधकांची तिसरी आघाडी तयार? BJP विरोधात नवे प्रादेशिक पक्ष सज्ज

Brock Lesnar Retirement: 10 वेळचा WWE वर्ल्ड चॅम्पियन ब्रॉक लेसनर निवृत्त; म्हणाला, 'योग्य वेळी थांबण्याचा निर्णय...'

Goa Politics: भाजपने गोव्याला केले ‘नशायुक्त’ राज्य; भाजप सरकारवर काँग्रेसचा घणाघाती आरोप

Horoscope: गुरुवार ठरणार खास! 'या' राशींना नोकरी-व्यवसायात मोठं यश, धनलाभ आणि प्रगतीचे प्रबळ संकेत

Goa Fast Track Immigration: गोव्यात सुरू होणार 'फास्ट ट्रॅक इमिग्रेशन'; गृहमंत्री अमित शहा आणि पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

SCROLL FOR NEXT