Winter Dry Skin Remedies Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Dry Skin Remedies: हे फेस पॅक ड्राय स्किनला बनवतील चमकदार

Winter Dry Skin Remedies: हिवाळ्या त्वचा जास्त कोरडी पडते. अशावेळी फेस पॅक वापल्यास ही समस्या कमी होऊ शकते.

Puja Bonkile

Winter Dry Skin Remedies: हिवाळ्यात अनेक समस्या निर्माण होतात. या दिवसांमध्ये अनेक आजारांचा धोका वाढतो. थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा कोरडी होते. कोरडेपणामुळे चेहरा कोरडा आणि निर्जीव दिसू लागते.

त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी बाजारात अनेक प्रोडक्ट उपलब्ध आहेत. पण त्याचा काही फरक पडत नाही. चेहऱ्यावरचा ड्रायनेस कमी करण्यासाठी तुम्ही घरीच केळीपासून बनवलेला फेस पॅक वापरू शकता.

केळीपासून बनवा विविध फेस पॅक

  • केळी आणि दुधाचा

केळी आणि दूध एकत्र करूनही फेसपॅक बनवू शकता. दूध त्वचेसाठी खूप चांगले आहे. दूध त्वचेसाठी क्लिन्झरचेही काम करते.

केळी आणि दुधाचा फेस पॅक बनवण्यासाठी केळी मॅश करा आणि त्यात दोन ते चार चमचे दूध चांगले मिक्स करावे. चेहऱ्यावर लावा आणि सुमारे 15-20 मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावे.

  • केळी आणि रवा

केळी आणि रवा एकत्र करूनही फेसपॅक बनवू शकता. केळी आणि रव्याचा फेस पॅक बनवण्यासाठी केळी मॅश करा आणि त्यात दोन ते चार चमचे रवा मिक्स करावा. नंतर चेहऱ्यावर लावावे आणि सुमारे 15-20 मिनिटांनी चेहरा धुवावा.

  • केळी आणि ओट्सचा

केळीसोबत ओट्स मिक्स करूनही फेस पॅक बनवता येते. यासाठी केळीला ओट्ससोबत मॅश करा आणि मिक्स करावे. तुम्ही त्यात थोडं मध देखील घालू शकता.

हे सर्व चांगले मिक्स करावे मग चेहऱ्यावर लावावे. 15 मिनिटं ठेवल्यानंतर चेहरा धुवावा. 

  • केळी आणि मध

मध त्वचेसह आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. केळीमध्ये मध मिक्स करून तुम्ही फेस पॅक बनवू शकता. यासाठी केळी मॅश करावे. मॅश केलेल्या केळ्यामध्ये एक चमचा मध घालून चांगले मिक्स करावे.

केळी आणि मधापासून बनवलेला हा फेस पॅक चेहऱ्यावर लावा आणि सुमारे 15 मिनिटे चेहऱ्यावर राहू द्या आणि नंतर चेहरा स्वच्छ धुवावे. यामुळे कोरड्या त्वचेपासून सुटका होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

खरी कुजबुज: काँग्रेस-भाजपमधील शीतयुद्ध

Viral: 8 कोटींचे दागिने घालून नववधू मंडपात; पण व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची एन्ट्री अन् वराला ठोकल्या बेड्या! नेमकी भानगड काय? Watch Video

SCROLL FOR NEXT