Tulsi 2023 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Winter Care Tips: हिवाळ्यात तुळशीच रोप कोरड पडतय? मग वापरा 'या' ट्रिक्स

Winter Care Tips: हिवाळ्यात रोपांची काळजी घेणे गरजेचे असते.

Puja Bonkile

Tulsi in Winter Care: हिंदू धर्मात तुळशीला खूप महत्त्व आहे. धार्मिक महत्त्वाव्यतिरिक्त हे अनेक आरोग्य समस्यांवर देखील प्रभावी मानले जाते. वैद्यकीय शास्त्रातही तुळशीला औषधाचा दर्जा देण्यात आला आहे. 

या दोन महत्त्वाच्या कारणांमुळे बहुतेक घरांमध्ये तुळशीचे रोप पाहायला मिळते. पण त्याच्या देखभालीबद्दल लोकांना फारशी माहिती नाही.

त्यामुळे हिवाळ्यातही अनेकवेळा घराच्या अंगणात लावलेले तुळशीचे रोप सुकते. अशावेळी तुळशीचे रोप सुकण्यापासून वाचवण्यासाठी काय करावे हे जाणून घेऊया.

दमट वातावरण

तुळशीचं रोपं दमट वातावरणात वाढत नाही. अशावेळी थंड हवामानात जास्त ओलावामुळे ते कोमेजून जाते. त्यामुळे तुळशीच्या रोपांमध्ये ओलावा जमा होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा पाने गळायला लागतील.

तुळशीच्या रोपापासून 15 ते 20 सेंटीमीटर माती खोदून तुम्ही ही समस्या सोडवू शकता. जेव्हा मुळांवर ओलावा दिसून येतो तेव्हा त्यांना कोरडी माती आणि वाळू भरा.

बुरशीजन्य संसर्ग टाळावे

तुळशीच्या रोपाला बुरशीजन्य संसर्ग होण्याची शक्यता असते. जी अनेकदा जास्त आर्द्रतेमुळे होते. कडुलिंबाची फवारणी करून तुम्ही हे टाळू शकता. संसर्गापासून बचाव करण्यासाठी तुम्ही ही पावडर मातीत मिक्स करू शकता.

जर तुम्हाला कडुलिंबाची पावडर सापडत नसेल तर तुम्ही उकडलेली कडुलिंबाची पाने देखील वापरू शकता. बुरशीजन्य संसर्ग टाळण्यासाठी हे पाणी दर 15 दिवसांनी जमिनीत टाकावे.

थंड पाणी टाकू नका

हिंदू मान्यतेनुसार रोज सकाळी तुळशीच्या रोपाला पाणी घालणे शुभ मानले जाते. पण हिवाळ्यात थंडीच्या दिवसांमध्ये खूप थंड पाणी तुळशीच्या रोपाला घालू नका. कारण ते कोरडे होऊ शकते. तसेच जास्त प्रमाणात पाणी घालणे टाळावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT