Winter Care Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Winter Care: हिवाळ्यात स्वेटर, मफरलसारख्या उबदार कपड्यांची अशी घ्या काळजी, वर्षानुवर्षे दिसतील नवे

हिवाळ्यात वापरल्या जाणाऱ्या उबदार कपड्यांची योग्य काळजी न घेतल्याने लगेच जुने दिसु लागतात.

Puja Bonkile

Winter Care Tips: हिवाळ्यात लोक महागडे स्वेटर,जॅकेट यासारखे उबदार कपडे खरेदी करतात. पण अनेकदा या कपड्यांची काळजी न घेतल्याने आणि नीट न ठेवल्यामुळे ते लवकरच रंगहीन आणि जुने दिसू लागतात. उबदार कपडे खूप जाड असले तरी ते खूप नाजूकही असतात, त्यामुळे ते धुण्याची आणि नीट ठेवण्यासाठी योग्य पद्धतीचा वापर करावा.

या कपड्यांचे संरक्षण करण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्यापासून आर्द्रता दूर ठेवणे गरजेचे असते. यासोबतच त्यांना धुण्याची, वाळवण्याची वेगळी पद्धत आहे. जर तुम्ही लोकरीचे आणि उबदार कपडे व्यवस्थित ठेवले तर ते वर्षानुवर्षे टिकतील आणि नवीनसारखे चांगले राहतील.

ओलसर ठिकाणी ठेऊ नका
लोकरीचे कपडे नेहमी कोरड्या जागी ठेवावे. हे रोज घालावे लागतात आणि काढावे लागतात. निष्काळजीपणामुळे आपण अनेकदा लोकरीचे कपडे बाथरूममध्ये देखील सोडतो, जे योग्य नाही. तुम्ही वापरत नसलेले लोकरीचे कपडे उन्हात वाळवा आणि कोरड्या व बंद ठिकाणी ठेवावे. 

ऊन्हात ठेवावे
थंडीच्या दिवसात अनेकदा आर्द्रता असते आणि आर्द्रता ही लोकरी आणि उबदार कपड्यांचे शत्रू असते. ओलाव्यामुळे लोकरीच्या कपड्यांमध्ये बुरशी निर्माण होते, जी काहीवेळा वरून दिसत नाही पण आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असते. त्यामुळे उन्हात उबदार कपडे दाखवणे गरजेचे आहे.

गरम पाणी टाळा
लोकरीचे आणि उबदार कपडे खूप मऊ असतात. त्यांना गरम पाण्यापासून दूर ठेवावे. गरम पाण्यात धुतल्यावर कपडे लहान होण्याचा धोका असतो. त्यामुळे ते फक्त थंड पाण्यानेच धुवावेत. अस्वच्छ कपडे धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर केला जाऊ शकतो.

लिक्विड डिटर्जंटचा वापर
लोकरीचे कपडे धुण्यासाठी फक्त लिक्विड डिटर्जंटचा वापर करावा. त्यात अतिशय मऊ रसायने असतात. जी लोकरीच्या कपड्यांसाठी उपयुक्त असतात. याशिवाय लोकरीचे व उबदार कपडे मऊ ब्रशनेच स्वच्छ करावेत. वॉशिंग मशिनमध्येही लोकरीचे व उबदार कपडे धुवू नयेत.

कपड्यांवरील डाग कसे काढाल
लोकरीच्या कपड्यांवर डाग असल्यास प्रथम पाणी कोमट करा. लक्षात ठेवा की पाणी जास्त गरम नसावे. आता या कोमट पाण्यात थोडे स्पिरिट  घालावे. ही स्पिरिट असलेल्या कोमट पाण्याने लोकरीचे कपडे धुवा.

सामान्य प्रेस वापरू नका
लोकरीचे कपडे प्रेस करण्यासाठी सामान्य प्रेस वापरू नका. स्टीम आयन नेहमी लोकरीचे आणि उबदार कपड्यांसाठी वापरावे. स्टीम आयन घरी उपलब्ध नसल्यास लोकरी आणि उबदार कपड्यांवर सुती कापड ठेवा आणि त्यांना प्रेस करावे.

कसे ठेवावे कपडे
ज्या सूटकेसमध्ये किंवा बॉक्समध्ये तुम्ही कपडे ठेवत आहात त्यात प्रथम वर्तमानपत्र पसरवा आणि नंतर त्यावर काही कोरडी कडुलिंबाची पाने ठेवावे. हे ओलावा टाळेल आणि तुमचे कपडे सुरक्षित राहतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

EPFO कडून पेन्शनधारकांसाठी मोठी खूशखबर! आता घरी बसून जमा करता येणार 'डिजिटल लाईफ सर्टिफिकेट'; जाणून घ्या पद्धत

Abhishek Sharma T20 Record: सिक्सर किंग अभिषेक शर्माची कमाल! पॉवरप्लेमध्ये 100 षटकार मारणारा ठरला जगातील पहिला फलंदाज; रोहित शर्माला सोडले मागे

Donald Trump Iran Jail: डोनाल्ड ट्रम्पला इराणनं तुरुंगात डांबलं? तेहरानमधील व्हायरल व्हिडिओनं जगात खळबळ; अमेरिकेच्या दादागिरीला चोख प्रत्युत्तर VIDEO

Codli Iron Ore Mine: कोडली खाण पुन्हा सुरू करण्यावर संमिश्र प्रतिक्रिया; रोजगाराची आशा, पण पाणी, शेती आणि प्रदूषणाची गंभीर चिंता

Made In India Smartphone Brand: ॲपल-सॅमसंगला देणार टक्कर! भारत 2028 पर्यंत लॉन्च करणार स्वतःचा स्मार्टफोन ब्रँड; केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT