Family Day| Family Day 2022  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Family Day: कुटुंबाचे महत्त्व सांगणारा 'आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस'....

International Family Day 2022: दरवर्षी 15 मे हा दिवस 'आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस' म्हणून साजरा केला जातो.

दैनिक गोमन्तक

दरवर्षी जगभरात 15 मे हा दिवस 'आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन' म्हणून साजरा केला जातो. कुटुंबाचे महत्त्व सांगणारा हा दिवस सर्वत्र लोक आनंदाने साजरा करतात. सध्याच्या धावपळीच्या काळात कुटुंबाचे महत्त्व अजूनच वाढले आहे. समाजाची कल्पना कुटुंबाशिवाय अपूर्ण आहे. कुटुंबामुळे आपण समाजातील इतर व्यक्तींशी जोडले जातो. कुटुंब (Family) फक्त आपले नातेचं सुधारत नाही तर ते आपल्याला प्रत्येक सुख दुःखात साथ देखील देते. त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात कुटुंबाचे महत्त्वाचे स्थान आहे. आजच्या आधुनिक काळातही त्याचे महत्त्व थोडे सुद्धा कमी झाले नाही. (International Family Day 2022 News)

परंतु, आपापसातील मदभेदांमुळे आधुनिक काळातील कुटुंब खूप लवकर एकमेकांपासून लांब जाऊ लागले आहेत. अशावेळी कुटुंबाचे खास महत्त्व सांगणारा दिवस म्हणून 'आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस' साजरा केला जातो. आजकाल जॉबमुळे (Job) अनेक लोकांना स्वतःच्या कुटुंबांपासून दूर रहावं लागतं. त्यामुळेच अनेक कुटुंब विस्कळीत होऊ लागले आहेत. खरंतर आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस साजरा करण्याचा मूळ उद्देश आजच्या तरूण पिढीला एकत्र कुटुंबाचे महत्त्व समजावे हा आहे.

संयुक्त राष्ट्रांनी 1980 च्या दशकात कुटुंबाशी संबंधित समस्यांवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. 1983 मध्ये, आर्थिक आणि सामाजिक परिषद, सामाजिक विकास आयोगाने, विकास प्रक्रियेत कुटुंबाच्या भूमिकेवर ठरावाची शिफारस केली. त्यानुसार15 मे हा दिन साजरा केला जाऊ लागला.कुटुंबाचे महत्व, प्रत्येक कुटुंबाविषयी प्रेम, आदर वाढविण्यासाठी हा दिन साजरा केला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT