Lung Cancer Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Lung Cancer : धूम्रपान न करणाऱ्यांनाही का होतो फुफ्फुसाचा कर्करोग? वाचा सविस्तर

फुफ्फुसाचा कर्करोग हा असाच एक कर्करोग आहे, जो संपूर्ण जगात कर्करोगामुळे सर्वाधिक मृत्यूचे कारण आहे.

दैनिक गोमन्तक

Lung Cancer : जगात सर्वाधिक मृत्यू कोणत्या कर्करोगामुळे होतात हे तुम्हाला माहीत आहे का? तसे, सर्व प्रकारचे कर्करोग धोकादायक मानले जातात. परंतु फुफ्फुसाचा कर्करोग हा असाच एक कर्करोग आहे, जो संपूर्ण जगात कर्करोगामुळे सर्वाधिक मृत्यूचे कारण आहे.

फुफ्फुसाचा कर्करोग हा स्तन आणि प्रोस्टेट कर्करोगानंतरचा तिसरा सर्वात सामान्य कर्करोग आहे. सिगारेटचा धूर हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे मुख्य कारण मानले जाते.

फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या रुग्णांची संख्या कमी होत असली तरी धूम्रपान न करणाऱ्यांमध्येही हा कर्करोग वाढत असल्याचे दिसून आले आहे. म्हणजेच, असे अनेक घटक आहेत, जे फुफ्फुसांवर एकप्रकारे परिणाम करत आहेत आणि त्यामध्ये कर्करोग निर्माण करतात. धूम्रपान न करणाऱ्यांमध्ये फुफ्फुसाचा कर्करोग होण्याची अनेक कारणे असू शकतात. चला जाणून घेऊया त्या कारणांबद्दल...

धुम्रपान व्यतिरिक्त फुफ्फुसाचा कर्करोग होण्याची अनेक कारणे :

1. धूम्रपान करणाऱ्यांच्या संपर्कात येणे : असे बरेच लोक आहेत जे धूम्रपान करत नाहीत, परंतु धूम्रपान करणाऱ्यांच्या संपर्कात येतात. जर तुम्ही अशा ठिकाणी उभे असाल जिथे कोणी धूम्रपान करत असेल, तर जाणूनबुजून किंवा नकळत तुम्ही देखील तो धूर आपल्या आत घेत असता. हा धूर घेतल्यास फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका वाढू शकतो.

2. वायू प्रदूषण : भारतातील फुफ्फुसाच्या कर्करोगाचे मुख्य कारण म्हणजे वायु प्रदूषण. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, वायुप्रदूषणामुळे दरवर्षी 1.8 दशलक्ष लोक फुफ्फुसाच्या कर्करोगाने मरतात. वायू प्रदूषण फुफ्फुसाच्या कर्करोगासह अनेक आरोग्य समस्यांशी निगडीत आहे.

3. रेडिएशन एक्सपोजर : रेडिएशन एक्सपोजरमुळे फुफ्फुसांच्या पेशींमधील डीएनए खराब होऊ शकतो. यामुळे उत्परिवर्तन होऊन फुफ्फुसाचा कर्करोग होऊ शकतो. अणुउद्योगात काम करणाऱ्या लोकांसारख्या उच्च पातळीच्या आयनीकरण किरणोत्सर्गाच्या संपर्कात आलेल्या लोकांना फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT