Benefitis of eating on banana leaves  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

South Indianभागात का दिलं जातं केळीच्या पानांना महत्व

ओणम सणाला केळीच्या पानांवरच जेवण केलं जातं.

दैनिक गोमन्तक

दक्षिण भारतीय राज्यांमध्ये (South India) केळीच्या पानांवर (Banana leaf) अन्न देण्याची परंपरा आहे. विशेष म्हणजे ओणम सारख्या सणाच्या दिवशी केळीच्या पानांवरच (Banana leaf) जेवण केल्या जाते. केळीच्या पानांवर तांदूळ, मास, भाज्या, मसूर,करी आणि लोणचे असे अनेक पदार्थ मावेल एवढे मोठे पान असते. केळीच्या पानांवर जेवण करण्याची परंपरा खूप जुनी आहे. चला तर मग जाणून घेवूया केळीच्या पानांवर जेवण करण्याचे आरोग्यास कोणते फायदे आहेत.

* पोषक घटक मिळतात

केळीच्या पानांमध्ये अँटिबॅक्टीरियल गुण असतात. यामुळे केळीच्या पानांवर (Banana leaf) जेवण केल्याने अनेक आजारांपासून बचाव होतो. म्हणून केळीच्या पानांवर जेवण करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.

* जेवणाची चव वाढते

केळीच्या पानांवर (Banana leaf) एक सूक्ष्म मेणाचा लेप असतो. यामुळे जेवणाची चव वाढते. जेव्हा केळीच्या पानांवर गरम अन्न वाढल्या जाते, तेव्हा ते मेण अन्नात मिक्स होते. यामुळेच अन्नाची चव अधिक वाढते.

* पर्यावरण पूरक

अनेक लोक प्लास्टिक प्लेटस् वापरतात. प्लास्टिकच्या अतिवापरामुळे पर्यावरणास धोका निर्माण होऊ शकते. याउलट केळीची पाने पर्यावरण पूरक आहेत. कारण यामुळे पर्यावरण दूषित होत नाही. केळीच्या पानांचे विघटन प्लास्टिक प्लेटस् तुलनेत लवकर होते.

* केळीचे पाने स्वच्छ असतात

केळीचे पाने (Banana leaf) जास्त स्वच्छ करण्याची गरज नसते. केळीचे पाने पाण्याने स्वच्छ करता येतात. प्लास्टिक प्लेटसच्या तुलनेत केळीच्या पानावर जेवण करणे आरोग्यासाठी लाभदायी ठरते.

* केळीच्या पानांवर जेवण करण्याचे इतर फायदे

  • केळीच्या पानांवर नियमित जेवण केल्याने केसांचे आरोग्य चांगले राहते.

  • केळीच्या पानामध्ये असे पोषक घटक असतात की ज्यामुळे चेहऱ्यावरील मुरूम कमी होण्यास मदत मिळते.

  • केळीच्या पानांचे सेवन केल्याने पोटाशी संबंधित असलेले आजार दूर ठेवतात.

  • पालेभाज्यांप्रमाणे केळीच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT