wheatgrass juice Dainik Gomantak
लाइफस्टाइल

प्रतिकारशक्ती वाढवण्यापासून ते हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यापर्यंत गव्हांकुराचे जबरदस्त फायदे

Monsoon wheat Grass juice Tips: गव्हांकुराचा रस नियमित पिल्याने आरोग्य निरोगी राहते.

दैनिक गोमन्तक

गव्हांकुराचा रस नियमित प्यायल्याने शरीरातील सर्व आवश्यक पोषक तत्वांची कमतरता पूर्ण होते. हा रस गव्हाच्या ताज्या पानांपासून तयार केला जातो. या रसामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन, प्रथिने, खनिजे, फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. तसेच क्लोरोफिल, फ्लेव्होनॉईड्स, व्हिटॅमिन-सी आणि व्हिटॅमिन-ई देखील असतात. वाढते वजन आणि मधुमेह (Diabetes) नियंत्रणात ठेवण्यासाठीही गव्हाचे गवत खूप फायदेशीर ठरते. चला तर मग जाणुन घेउया व्हीटग्रास (wheat Grass) ज्यूसचे जबरदस्त फायदे कोणते आहेत. (wheat Grass juice Tips News)

* रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत
गव्हांकुराचा रसाध्ये 17 विविध प्रकारचे अमीनो ऍसिड असतात, त्यात अँटी-ऑक्सिडंट्स तसेच अनेक पौष्टिक घटक मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे याचे सेवन केल्याने तुमची प्रतिकारशक्ती (Immunity) वाढण्यास खूप मदत होते. तसेच फायबरचे प्रमाण देखील तुमची पचनक्रिया सुधारण्यास मदत करते.

* हिमोग्लोबिनची पातळी वाढविण्यात मदत

गव्हांकुराचा रसाध्ये क्लोरोफिल मोठ्या प्रमाणात आढळते. जे हिमोग्लोबिनची पातळी वाढविण्यात मदत करते. मासिक पाळीमध्ये ज्यांच्या शरीरात रक्ताचे प्रमाण आधीच खूप कमी आहे, त्यांनी या रसाचे सेवन केले पाहिजे. व्हीटग्रास हे खूप चांगले आणि आरोग्यदायी (Health) अन्न आहे.

* रक्तातील साखर नियंत्रित ठेवते

गव्हांकुराचा रसाचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. मधुमेहाच्या रुग्णांनी नियमितपणे रसाचे सेवन केल्याने त्यांना अनेक फायदे होतात.

* कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते

गव्हांकुराचा रस प्यायल्यानेही कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढल्याने हृदयविकाराचा धोका वाढु शकतो.

* डेंग्यूमध्ये प्लेटलेट्स वाढवतात

गव्हाच्या गवताचा रसामुळे आजार होण्याचा धोका कमी होतो. पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू यांसारख्या आजारांवर याचा फायदा होतो. गहू डेंग्यूमध्ये प्लेटलेट्स वाढवण्यासही मदत करतो.

* लठ्ठपणा कमी होतो

गव्हांकुराचा रसाचे सेवन केल्याने लठ्ठपणाची समस्या कमी होते. व्हीटग्रासमध्ये भरपूर फायबर असते आणि कॅलरीज खूप कमी असतात. याचे सेवन केल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते. यामुळे भुक लागत नाही. वजन नियंत्रमात राहते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रीडा विश्वात मोठी खळबळ! भारतीय खेळाडूकडून हॉटेलमधील महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ, पोलिसांकडून कारवाई

Asian Para Games 2026: सुवर्णा राजची 'गोल्ड' कामगिरी! डिस्कस थ्रोमध्ये पटकावलं सुवर्णपदक; आशियाई पॅरा गेम्समध्ये रचला इतिहास

Royal Enfield Upcoming Bikes: 'रॉयल एनफील्ड' आणणार 5 नव्या बाइक्स, 750cc सेगमेंटपासून इलेक्ट्रिक मॉडेलपर्यंत अनेक पर्याय मिळणार

October Heat: 'ऑक्टोबर हिट'मध्ये रुग्णवाहिका बंद पडली; मदतीला धावले अनोळखी हात, पण अधिकारी उभा राहिला बाजूला!

Waste Management: गोव्यात दररोज 3,824 किलो जैववैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया; आकडेवारी आली समोर

SCROLL FOR NEXT