Lakshmi Panchami 2023 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Lakshmi Panchami 2023: लक्ष्मी पंचमीला अशी करावी देवीची पूजा, घरात सुख-शांती नांदेल

आज आपण श्री पंचमी किंवा श्री लक्ष्मी पंचमी साजरी करत आहोत.

दैनिक गोमन्तक

Lakshmi Panchami 2023: चैत्र महिन्याची सुरूवात झाली असुन लागोपाठ सण उत्सवांची मालिकाच सुरू झाली आहे. शनिवारी आपण विनायक चतुर्थी साजरी केली आणि गणरायाकडे आपण बुद्धीचं वरदान मागितले.

त्यापाठोपाठ आज म्हणजेच 26 मार्च 2023 रोजी आपण श्री पंचमी किंवा श्री लक्ष्मी पंचमी साजरी करत आहोत. हे व्रत माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी केले जाते. हे व्रत केल्यास कुटुंबात सुख-शांती नांदते.श्री लक्ष्मी पंचमी आज दुपारी 2 वाजल्यापासून सुरू होईल.

  • काय करावे

आधी आंघोळ करून एका पाटावर लाल कापड किंवा भगवं कापड अंथरावे

नंतर देवी लक्ष्मी आणि श्रीविष्णू यांचा फोटो किंवा धातुची मूर्ती  ठेवावी.

त्यामुर्तीला शुद्ध पाण्याने स्नान घालावे.

मूर्ती समोर साजूक तुपातले निरांजन लावावे आणि सुगंधी उदबत्ती लावावी.

त्यानंतर श्री लक्ष्मी मातेची आणि श्री विष्णूंची विधिवत पूजा करावी आणि श्री लक्ष्मी मातेला गोडाचा नैवेद्य दाखवावा.

यादिवशी फक्त सात्विक अन्नचे सेवन करावे. 

  • श्री पंचमीच्या पूजेने काय प्राप्त होतं

लक्ष्मी मातेला धनाची देवी मानले गेले आहे. सहाजिकच शुद्ध अंतकरण आणि भक्तीभावाने देवी लक्ष्मी आणि श्रीविष्णू यांची पूजा केल्यास संपत्ती मिळते असं सांगितलं जातं. खऱ्या भक्तीने केलेली उपासना धन, सुख आणि समृद्धी देते. 

श्री पंचमीच्या दिवशी श्रीयंत्राची पूजा स्थापित करणे खूप शुभ आहे. 

या दिवशी माता लक्ष्मी साक्षात् श्रीयंत्रात विराजमान असते. 

श्रीयंत्राची स्थापना घरामध्ये (Home) किंवा व्यावसायिक प्रतिष्ठानमध्ये केल्याने धनाचा ओघ वेगाने वाढतो. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि प्रगतीसाठी लक्ष्मी पंचमी व्रत अवश्य पाळावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! 18,000 रुपयांचे बेसिक थेट 72,000 रुपये होणार? फिटमेंट फॅक्टरसह समजून घ्या हे 4 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे

Thailand Heavy Rainfall: पूराच्या पाण्यात बुडाले बँकॉक, 7 लाख नागरिक प्रभावित, रस्त्यांवर सापांचा वावर; थायलंडमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार VIDEO

Teachers Salary Issue: 'त्या' 3 हजार शिक्षिकांना वेतनवाढ कधी? अमित पाटकर आक्रमक; सरकारला 8 दिवसांची मुदत

Goa Politics: काँग्रेससोबत 'आरजी'ची जागावाटपासाठी बैठक; 16 जागांचा प्रस्ताव, सासष्टीत जागेसाठी जोर

'SIR'च्या मुद्द्यावरुन भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल; यतिश नाईक म्हणाले, 'हा तर संविधानिक संस्थांवर हल्ला’

SCROLL FOR NEXT