Swastik Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Swastik: स्वस्तिक काढतांना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?

घरासमोर स्वस्तिकचे तिन्ह असणे शुभ मानले जाते.

Puja Bonkile

Swastik Tips: भारतीय संस्कृतीत स्वस्तिकला खुप महत्व आहे. कोणतेही शुभ काम करताना सर्वात पहिले स्वस्तिक काढले जाते. घरातल्या उंबरठ्यापासून ते घरात होणारे शुभ कार्य असो. एखादा मंगल कार्यक्रम असो किंवा अगदी सत्यनारायणाची पूजा असो.

प्रत्येक ठिकाणी स्वस्तिक काढल्याशिवाय शुभ कार्यक्रमाला सुरुवात होत नाही. पण हे स्वस्तिकचे चिन्ह नेमके कशाचे प्रतीक आहे आणि स्वस्तिक काढताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे हे आपण जाणून घेउया.

  • काय आहे स्वस्तिक चिन्हाचा अर्थ

स्वस्तिक हे भारतीय (India) स्कृतीचे शुभप्रतीक आहे. स्वस्तिकचा सुचक अर्थ 'कल्याण असो' असा आहे.

स्वस्तिक मध्ये सूर्य, इंद्र, वायु, पृथ्वी, लक्ष्मी, विष्णू, ब्रम्हदेव, शिवपार्वती,श्रीगणेश अशा अनेक देवतां वास करतात. शांती,समृद्धी आणि मंगल यांचे प्रतीक स्वस्तिक ला मानले जाते.

  • असे काढावे स्वस्तिक

तुम्ही हळद किंवा शेंदुराने स्वस्तिक चिन्ह काढु शकता.

Swastik
  • कोणती दिशा स्वस्तिक काढण्यासाठी उत्तम आहे

नेहमी स्वस्तिक काढण्यासाठी उत्तर-पूर्व दिशा सर्वोत्तम आहे. पूजेच्या ठिकाणी किंवा घराच्या मुख्य दरवाजावरही स्वस्तिकचे प्रतीक बनवू शकता.

असे केल्याने देवी मातेच्या कृपेने तुम्हाला शुभ परिणाम तर मिळतात, याशिवाय वास्तुशी संबंधित समस्यांच्या नकारात्मक प्रभावापासूनही मुक्ती मिळते. स्वस्तिकचे चिन्ह घरात असल्यास घरात सकारात्मक उर्जा वास करते.

  • कोणती काळजी घ्यावी

घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यात आणि मंदिरात (Temple) स्वस्तिक काढल्याने वास्तुदोष दूर होतात. या दोन्ही ठिकाणी हळदीने स्वस्तिक बनवा आणि त्याखाली 'शुभ लाभ' असे लिहा.

असे केल्याने तुमच्या घरात (Home) नेहमी सकारात्मकता राहील. यासोबतच लक्ष्मीची कृपाही कायम राहील. लक्षात ठेवा स्वस्तिकचे चिन्ह 9 बोटे लांब आणि रुंद असावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: काँग्रेससोबत 'आरजी'ची जागावाटपासाठी बैठक; 16 जागांचा प्रस्ताव, सासष्टीत जागेसाठी जोर

AI+ New Gadgets: भन्नाट फीचर्स अन् जबरदस्त परफॉर्मन्स! AI+ ने बाजारात आणली 3 नवी शक्तिशाली गॅजेट्स; काय आहेत वैशिष्ट्ये? किंमत किती?

खरी कुजबुज: काँग्रेसची वजाबाकी

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT