Cholesterol Control Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Cholesterol Explained: अटॅक, स्ट्रोक, बीपी या समस्यांना जन्म देणारा घातक कोलेस्टेरॉल; थंडीत जास्त का आणि कसा वाढतो, काय काळजी घ्यावी?

How To Control Cholesterol In Cold: हिवाळ्यात कोलेस्ट्रॉल का वाढते आणि कोलेस्टेरॉल कसे नियंत्रित करता येईल याची माहिती आपण या लेखातून घेऊयात.

Pramod Yadav

How To Control Cholesterol In Cold

निरोगी आणि तंदुरुस्त शरीरासाठी, जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. निरोगी शरीरासाठी कोलेस्टेरॉलची भूमिका महत्त्वाची असते. शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्याचा थेट परिणाम हृदयावर होतो. यामुळे हृदयविकाराचा त्रास आणि अटॅकचा धोका वाढतो.

अनेक अभ्यासातून असेही समोर आले आहे की हृदयाच्या आरोग्यामध्ये आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. जर्नल करंट मेडिसिनल केमिस्ट्री 2019 मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, व्हिटॅमिन युक्त अन्न खाल्ल्याने तुमचे आरोग्य सुधारते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, हृदयविकार हे जगभरात मृत्यूचे प्रमुख कारण आहे. हिवाळ्यात कोलेस्ट्रॉल का वाढते आणि कोलेस्टेरॉल कसे नियंत्रित करता येईल याची माहिती आपण या लेखातून घेऊयात.

कोलेस्ट्रॉल म्हणजे काय? What Is Cholesterol?

कोलेस्टेरॉल हा चरबीसारखा चिकट पदार्थ आहे, जो आपल्या आहारातून शरीरात जातो आणि धमण्यांमध्ये जमा होऊ लागतो. कोलेस्टेरॉलचे दोन प्रकार आहेत, एक एलडीएल कोलेस्ट्रॉल (LDL) आणि दुसरे एचडीएल (HDL) कोलेस्ट्रॉल. एलडीएल चांगले तर एचडीएल कोलेस्ट्रॉल वाईट कोलेस्ट्रॉल असते. शरीरात एचडीएल कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या वाढू लागतात आणि हृदयविकाराचा धोका वाढू लागतो.

हिवाळ्यात चरबीयुक्त, तेलकट आणि जंक फूड खाण्याचे प्रमाण वाढते. तसेच या दिवसात चालणे आणि व्यायाम करणे देखील खूप कमी होते. त्याचप्रमाणे हिवाळ्यात जीवनशैलीसोबतच खाण्याच्या सवयीही बदलतात. शारीरिक हालचाली कमी होतात, ज्यामुळे सोडियम शरीरातून बाहेर पडत नाही. यामुळे रक्तवाहिन्या आकुंचित होऊ लागतात आणि खराब कोलेस्टेरॉल शिरांमध्ये जमा होऊ लागते. खराब कोलेस्टेरॉल जमा झाल्यामुळे हृदयावर दबाव येतो आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो.

कोलेस्टेरॉल कसे वाढते? How Cholesterol Increases?

- वजन वाढल्यामुळे एलडीएल कोलेस्टेरॉलची पातळीही वाढू शकते.

- काही आजारांमुळे या वाईट कोलेस्टेरॉलची पातळीही वाढू लागते.

- काही जुनाट आजार जसे रक्तातील साखर, किडनीचे आजार यामुळे कोलेस्ट्रॉल वाढू शकते.

- वाढत्या वयानुसार कोलेस्टेरॉलचे प्रमाणही वाढू शकते.

- तंबाखू, सिगारेट यांसारख्या अमली पदार्थांच्या सेवनानेही कोलेस्टेरॉल झपाट्याने वाढते.

कोलेस्ट्रॉल वाढल्याने काय त्रास होतो? Side effects of High cholesterol

कोलेस्टेरॉल शरीरातील पेशी, जीवनसत्त्वे आणि हार्मोनल बदलांच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते, परंतु अतिरिक्त कोलेस्ट्रॉलमुळे आरोग्याशी संबंधित अनेक आजारांचा धोका वाढतो. कोलेस्टेरॉल वाढल्याने हृदयविकाराचा झटका, हार्ट फेल्युअर, स्ट्रोक इत्यादीची शक्यता वाढते. ज्यांना बीपीची समस्या आहे त्या वृद्धांमध्ये कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते.

कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी काय करावे? How To Control cholesterol?

- कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यासाठी आपल्या दैनंदिन दिनचर्येत बदल करणे आवश्यक आहे.

- योग्य आहार घ्या आणि दररोज व्यायाम करा.

- रात्री झोपण्याच्या चार तास आधी पौष्टिक आणि हलका आहार घ्या.

- पुरेशी झोप आणि दररोज 20 ते 30 मिनिटे व्यायाम करणे देखील महत्त्वाचे आहे.

या सर्व पद्धतींनी कोलेस्टेरॉल नियंत्रित करता येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Petrol Diesel Prices In Goa: महाराष्ट्र, कर्नाटकपेक्षा गोव्यात पेट्रोल - डिझेल स्वस्त; जाणून घ्या ताजे भाव

Junta House: ‘पणजीतील जुन्‍ता हाऊस 30 दिवसांत रिकामे करा’, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; इमारतीचे होणार नूतनीकरण

Goa News Live: सराईत गुंड 'टारझन' विरोधात हत्यार कायद्याखाली गुन्हा; अड्डयावर सापडली तलवार

DSSY चे 13 हजार बोगस लाभार्थी! समाजकल्याण खात्यातर्फे पडताळणी; 50 कोटी रुपयांची वसूली

Gas Cylinder Seizure: 1021 पैकी 485 सिलिंडर रिकामे, वजनमाप खात्‍याकडून मोजणी; अहवाल मिळाल्‍यानंतर पोलिस करणार कारवाई

SCROLL FOR NEXT