Weight Loss  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Weight Loss साठी 'हा' सिंपल फंडा नक्की ट्राय करा

Weight Loss: लठ्ठपणामुळे अनेक आजार उद्भवू शकतात. यामुळे वजन नियंत्रात ठेवण्यासाठी काय करावे हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

weight loss tips these simple tips keep fit and healthy

खाण्याकडे दुर्लक्ष आणि योगाचा अभाव यामुळे वजन वाढते. आजकाल वजन वाढणे ही सामान्य समस्या बनली आहे. या समस्येमुळे अनेक आजार निर्माण होतात. शरीराचे वजन नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. जर तुम्ही लठ्ठपणाने त्रस्त असाल आणि वजन कमी करायचे असेल तर तुम्ही सोप्या पद्धतीने वजन कमी करू शकता.

खाण्यावर नियंत्रण ठेवा

जास्त खाणे हे वजन वाढण्याचे एक मोठे कारण आहे. अनेक लोकांना फास्ट फूड आणि तळलेले पदार्थ खाण्याची आवाड असते. ते सारखं काहीतरी खात राहतात. या लोकांचे वजन सतत वाढत असते. यामुळे त्यांना लठ्ठपणाचा सामना करावा लागतो. वजन कमी करण्यासाठी आणि वजन वाढण्यापासून रोखण्यासाठी खाण्यावर नियंत्रण ठेवावे.

योगा

पदार्थांमधून शरीराला पोषण आणि कॅलरीज मिळतात. जास्त कॅलरीजमुळे वजन झपाट्याने वाढू लागते. कॅलरी बर्न करण्यासाठी नियमितपणे व्यायाम करावा. झुंबा आणि योगाद्वारे तुम्ही वजन कमी करू शकता.

फास्ट फुड खाणे टाळावे

एखाद्याने पॅकेज केलेले पदार्थ, कोल्ड ड्रिंक्स, स्नॅक्स आणि प्रक्रिया केलेले पदार्थ यापासून दूर राहावे. हे खाल्ल्याने वजन झपाट्याने वाढते, त्यामुळे हे पदार्थ खाणे टाळावे. या पदार्थांमध्ये कमी पोषण आणि उच्च कॅलरी असतात, ज्यामुळे वजन वाढू शकते.

योग्य आहार घ्यावा

बाहेरचे पदार्थ खाल्ल्याने वजन वाढू शकते. त्याऐवजी पौष्टिक आणि सकस आहार घ्यावा. पौष्टिक आहार घेतल्याने शरीराला सर्व पोषक तत्वे मिळतात. आहारात फळं, भाज्या, ज्युस आणि कडधान्य यांचा समावेश करावा.

हायड्रेट राहावे

वजन कमी करण्यासाठी शरीर हायड्रेट असणे गरजेचे आहे. यासाठी पुरेसे पाणी प्यावे. पाणी प्यायल्याने अतिरिक्त कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. पाणी प्यायल्याने पोट भरलेले राहते. यामुळे भूक कमी होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT