weight loss dr michael mosley shares 2 simple things exercise to do every morning to help weight loss Dainik Gomantak
लाइफस्टाइल

वजन होईल झपाट्याने कमी, रोज सकाळी करा 'या' 2 सोप्या गोष्टी

केवळ व्यायामाने वजन कमी होत नाही

दैनिक गोमन्तक

वजन कमी करण्यासाठी बहुतेक लोक इंटरनेटवर दिलेल्या माहितीवर अवलंबून असतात. वजन कमी करण्यासाठी, ते योग्य आहार, व्यायाम यावर जास्त भर देतात आणि तस अनुसरण करतात. कोरोनाच्या काळापासून लोकांमध्ये त्यांच्या वाढत्या वजनाबाबत अधिक जागरूकता दिसून येत आहे, त्यामुळे अनेक फिटनेस तज्ञही फिटनेस टिप्स शेअर करत आहेत. अलीकडेच डॉक्टरांनी वजन कमी करण्यासाठी व्यायामासोबतच आहाराचे महत्त्व सांगितले आहे. यासोबतच त्यांनी असेही सांगितले की, दररोज सकाळी 2 गोष्टी केल्याने वजन (weight loss) झपाट्याने कमी होण्यास मदत होते.

केवळ व्यायामाने वजन कमी होत नाही

फक्त व्यायामामुळे (Exercise) वजन कमी होण्यास मदत होईल. व्यायामाने मूड सुधारण्यास मदत होते, याहून अधिक काही नाही. वजन कमी करताना, प्रत्येकाने चरबी कमी होण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, स्नायू कमी करण्यावर नाही. वजन कमी करताना स्नायूंचे नुकसान होऊ नये म्हणून, दिवसभरात किमान 50 ग्रॅम चांगल्या दर्जाचे प्रथिने खाणे आवश्यक आहे.

या 2 पद्धती तुम्हाला जलद वजन कमी करण्यात मदत करतील

ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे, त्यांनी रोज सकाळी उठल्यानंतर 2 व्यायाम करावेत. या व्यायामांसाठी तुम्हाला कोणत्याही उपकरणाची गरज नाही आणि कोणीही हे व्यायाम कोणत्याही वयात करू शकतो. तुम्हालाही वजन कमी करायचे असेल, तर त्यासाठी पुश अप्स किंवा प्रेस अप्स आणि स्क्वॅटचा व्यायाम करावा. हे व्यायाम घरी सहज करता येतात.

धावणे, चालणे, पोहणे, सायकल चालवणे यासारख्या चांगल्या एरोबिक क्रिया हृदय आणि फुफ्फुसासाठी किती चांगल्या मानल्या जातात हे आपल्या सर्वांना माहीत आहे. या क्रियाकलापांव्यतिरिक्त, मी दररोज सकाळी हे 2 व्यायाम करण्याची शिफारस करतो. नवीन संशोधनाने (Research) हे सिद्ध केले आहे की दररोज ताकदीचे व्यायाम केल्याने स्नायू आणि मेंदूच्या क्रियेत कामात मोठी मदत होते.

पुश अप्स आणि स्क्वॅट्समुळे वजन कमी होईल

पुश अप व्यायामामुळे शरीराची ताकद वाढण्यास मदत होते आणि स्क्वॅटमुळे शरीराची आतील भाग (स्नायू) मजबूत होतात. पुश-अप व्यायाम केवळ स्नायूंना टोन करत नाही तर यामुळे झोप देखील सुधारू शकते. मेंदूचे कार्य सुधारण्यासाठी स्क्वॅट व्यायाम हा एक उत्तम व्यायाम आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT