Chana Dal Tikki Recipe Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Chana Dal Tikki Recipe: वीकेंडला स्पेशल बनवण्यासाठी ब्रेकफास्टमध्ये घ्या चना डाळ टिक्कीचा आस्वाद

तुम्ही बटाट्याची टिक्की अनेक वेळा खाल्ली असेलपण कधी चना डाळ टिक्कीची चव चाखलीत का?

Puja Bonkile

Chana Dal Tikki Recipe: तुम्हालाही वीकेंडला मुलांना काहीतरी चटपटीत आणि कुरकुरीत आणि चविष्ट खायला द्यायचे असतील तर आम्ही तुमच्यासाठी एक उत्तम रेसिपी घेऊन आलो आहोत. 

तुम्ही या वीकेंडला चना डाळ टिक्की बनवून मुलांना खायला देऊ शकता. हा पदार्थ बटाट्याच्या टिक्कीपेक्षा थोडी वेगळा आहे. चवीला अप्रतिम असून बनवायला देखील सोपा आहे.

त्याचबरोबर मुलांनाही टिक्की आवडतात. तर, वेळ न लावता, ते बनवण्यासाठी कोणते पदार्थ वापरले जातात आणि त्याची पद्धत काय आहे ते जाणून घेऊया.

चना डाळ टिक्की बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • चणा डाळ - 1 वाटी

  • उकडलेले बटाटे -2

  • बारीक चिरलेला कांदा

  • हिरवी धणे - 2 चमचे

  • हिरव्या मिरच्या 2/3

  • हळद पावडर- 1 टीस्पून

  • चाट मसाला-1 चमचा

  • गरम मसाला पावडर-1टीस्पून

  • आले - 1

  • चवीनुसार मीठ

  • तळण्यासाठी तेल

  • ब्रेडचे तुकडे

चना डाळ टिक्की बनवण्याची कृती

  • चना डाळ टिक्की बनवण्यासाठी डाळ एक कप पाण्यात धुवून उकळून घ्यावी.

  • डाळ मऊ झाली की गॅस बंद करावे.

  • डाळ पाणी न घालता बारीक करा.

  • नतंर बटाटेही उकळून घ्यावे. बटाटे उकळवून मॅश करावे.

  • नंतर एक चिरलेला कांदा, दोन चमचे हिरवे धणे, तीन हिरव्या मिरच्या, एक छोटा चमचा हळद घाला.

  • अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा आले आणि चवीनुसार मीठ घालून पेस्ट बनवा.

  • त्यात बारिक केलेली डाळी देखील घाला.

  • आता त्याचा थोडासा भाग घ्या आणि त्यातून टिक्की बनवा.

  • त्याचप्रमाणे एक एक करून सर्व टिक्की तयार करावे.

  • टिक्की बनवल्यानंतर ब्रेड क्रंबमध्ये टाकून मध्यम आचेवर तळण्यासाठी ठेवावे.

  • टिक्की दोन्ही बाजूंनी तपकिरी रंगाची होइपर्यंत तळावे.

  • चना डाळ टिक्की तयार आहे, हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह करु शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT