Wedding Distension Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Wedding Distension: ड्रीम डेस्टिनेशन वेडिंगसाठी 'हे' हिल स्टेशन्स बेस्ट पर्याय,जाणून घ्या ठिकाणांची नावं

ड्रीम डेस्टिनेशन वेडिंगसाठी कुठे जावे याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

Puja Bonkile

Wedding Distension: वेडिंग सीझन सुरू झाला आहे आणि प्रत्येकाची इच्छा आहे की आपले लग्न एखाद्या सुंदर ठिकाणी व्हावे. पण लग्नाच्या तयारीसाठी कोणते ठिकाण चांगले असेल याबाबत अनेक लोकांचा गोंधळ उडतो. हिवाळा ऋतू सुरू झाला असून सध्या या ऋतूत लग्न करणे सर्वांनाच आवडते. कारण ऊन कमी असल्याने तुमचा मेकअप खराब होत नाही आणि तुमच्या पाहुण्यांनाही यामुळे त्रास होणार नाही.

पण तुम्ही विचार केला आहे का की तुमचे लग्न जर पर्वतांच्या प्रेक्षणीय दृष्यांसह झाले तर किती मजा येईल. तुमचे फोटोही अधिक सुंदर येतील. अशी ठिकाण कोणती आहेत हे जाणून घेऊया.

नैनिताल

हिल स्टेशनवर लग्नाची तयारी करायची असेल तर उत्तराखंडचे नैनिताल हेही उत्तम ठिकाण आहे. हे ठिकाण तलाव आणि हिरवाईने वेढलेले एक आकर्षक हिल स्टेशन आहे. मनु महाराणी रिसॉर्ट आणि नैनी रिट्रीट, शांत पर्वतांच्या मधोमध वसलेले, लग्नासाठी एक प्रसिद्ध रिसॉर्ट मानले जाते. नैनी रिट्रीटमधून तुम्हाला नैनी तलावाचे विहंगम दृश्य दिसेल.

मसुरी

हे उत्तराखंडचे नयनरम्य हिल स्टेशन आहे. हे ठिकाण कपल्ससाठी सर्वोत्तम मानले जाते. हिरव्यागार टेकड्यांमध्ये वसलेली अनेक हॉटेल्स तुमच्या लग्नाच्या तयारीसाठी सर्वोत्तम ठिकाण आहेत. येथे जेडब्ल्यू मॅरियट मसुरी वॉलनट ग्रोव्ह रिसॉर्ट आणि मसूरीतील मॉल रोडजवळ स्थित जेपी रेसिडेन्सी मनोज मसूरी हे प्रसिद्ध रिसॉर्ट मानले जातात.

शिमला

हिमाचल प्रदेशमधील शिमला हे भारतातील सर्वात प्रसिद्ध हिल स्टेशनपैकी एक आहे. नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेले शिमला हे डेस्टिनेशन वेडिंगसाठी भारतातील सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. अनेक लोक त्यांच्या हनीमूनसाठी येथे येतात, परंतु जर तुम्ही या हनिमूनच्या ठिकाणीच तुमच्या लग्नाचे प्लॅनिंग देखील करू शकता.

उटी

तमिळनाडूमधील उटी हिल स्टेशन हे देखील डेस्टिनेशन वेडिंगसाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. निलगिरी टेकड्यांवरील सौंदर्यात तुमचे लग्न अविस्मरणीय बनवेल. याशिवाय पश्चिम बंगालचे दार्जिलिंग, मुन्नार-केरळ, गुलमर्ग-जम्मू-काश्मीर, मनाली-हिमाचल प्रदेश, माउंट अबू-राजस्थान, कूर्ग-कर्नाटक या शहरांना भेट देऊ शकता

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Monsoon: गोव्यात मान्सूनचे आगमन; हवामान विभागाडून चार दिवसांचा 'यलो अलर्ट'!

मालपे येथील संरक्षक भिंत पुन्हा धोक्यात; पावसाळ्यापूर्वी तातडीने दुरुस्ती करण्याची स्थानिकांची मागणी

Goa Power Cuts: हसापूर, हणखणेतील वीज समस्या सोडवा; काँग्रेस कार्यकर्त्यांची वीज कार्यालयावर धडक, साहाय्यक अभियंत्यांशी चर्चा

Hasapur Bridge: हसापूर पूल महिन्याभरात वाहतुकीस खुला; काँक्रीटचे काम पूर्ण

MACT Margao: अपघातात जखमी महिलेला भरपाई द्यावी , 4.51 लाख देण्याचा मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाचा आदेश

SCROLL FOR NEXT