Water Heater Rod Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Water Heater Rod Cleaning Tips: वॉटर हिटिंग रॉड स्वच्छ करण्यासाठी वापरा 'हे' घरगुती उपाय, झटक्यात होईल स्वच्छ

पाणी गरम करण्यासाठी वॉटर हिटिंग रॉडचा वापर करतात. पण ते बरेचवेळा खराब होतात.

Puja Bonkile

Water Heater Rod Cleaning Tips

थंडीच्या दिवसांमध्ये गरम पाण्याचा अधिक केला जातो. अनेकजण पाणी गरम करण्यासाठी वॉटर हीटरच्या रॉड वापरतात. पण अनेक दिवस ते वापरल्यानंतर रॉड अस्वच्छ आणि काळा दिसू लागतो. रॉडवर एक पांढरा थर देखील जमा होतो. त्यामुळे पाणी गरम करायला खूप वेळ लागतो आणि विजबील देखील जास्त येते. तुम्ही काही घरगुती पद्धतीने काही मिनिटांत रॉड नव्या सारखा चमकवू शकता.

लिंबू आणि मीठ

रॉड स्वच्छ करण्यासाठी तुम्ही लिंबू आणि मीठ वापरू शकता. त्यात चुना टाकल्यास अधिक चांगला परिणाम मिळेल. चुना आणि मीठ यांची पेस्ट बनवावी. नंतर दांड्यावर लावावी आणि 4 मिनिटांनंतर त्यावर अर्ध लिंबू चोळावे. नंतर स्वच्छ पुसावे. रॉड नव्या सारखा चमकेल.

हायड्रोजन पेरोक्साईडचा वापर

वॉटर हिटर रॉच स्वच्छ करण्यासाठा हायड्रोजन पेरोक्साईडचा वापर करू शकता. यासाठी 2 चमचे हायड्रोजन पेरॉक्साइड पाण्यात मिक्स करावा. नंतर गॅसवर पाणी हलके गरम करावे, नंतर या पाण्यात रॉड टाकावा. सुमारे 5 मिनिटांनंतर रॉड बाहेर काढावा आणि ब्रशने स्वच्छ घासावा. त्यामुळे रॉड स्वच्छ होईल.

व्हिनेगर आणि बेकिंग सोडा

वॉटर हिटर रॉड स्वच्छ करण्यासाठी तुम्ही बेकिंग सोडा आणि व्हिनेगरचे मिश्रण वापरू शकता. यासाठी 1 बादली पाणी आणि बेकिंग सोडा आणि व्हिनेगर घ्यावा. पाण्यात बेकिंग सोडा आणि व्हिनेगर मिक्स करावे. नंतर 4 ते 5 मिनिटांनंतर ब्रशने रॉड स्वच्छ घासावा. रॉड नव्या सारखा चमकेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT