Veg Spring Roll Recipe in Marathi Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Veg Spring Roll Recipe : झटपट होणारा व्हेज स्प्रिंग रोल; जाणून घ्या सोपी रेसिपी

Veg Spring Roll Recipe in Marathi : नूडल्स आणि रोल्सचे उत्कृष्ट मिश्रण असलेले स्प्रिंग रोल हे अनेकांना आवडत असून खूप प्रसिद्धही आहे.

दैनिक गोमन्तक

नूडल्स आणि रोल्सचे उत्कृष्ट मिश्रण असलेले स्प्रिंग रोल हे अनेकांना आवडत असून खूप प्रसिद्धही आहे. स्प्रिंग रोल्स हा 'स्ट्रीट फूड' खाद्यपदार्थांपैकी एक आहे. आपल्यापैकी बहुतेकांना असे वाटते की स्प्रिंग रोलची रेसिपी कठीण आहे. मात्र, वास्तव याच्या अगदी उलट आहे. ते तयार करायला मोमोसारखेच सोपे आहेत. जे घरी सहज तयार करता येतात. घरी काही स्वादिष्ट व्हेज स्प्रिंग रोल्स बनवण्यासाठी ही रेसिपी फॉलो करा.

(Veg Spring Roll Recipe in Marathi)

व्हेज स्प्रिंग रोलसाठी लागणारे साहित्य :

  • मैदा - 1 कप

  • कांदा - 1/2 कप

  • कोबी - 1 कप

  • शिमला मिरची - 1/2 कप

  • वाफवून घेतलेले नूडल्स- 1/2 कप

  • चिली सॉस - 2 टीस्पून

  • बारीक चिरलेला लसूण - 2 टीस्पून

  • बारीक चिरलेले आले – 1 टीस्पून

  • किसलेले गाजर - 1 कप

  • तेल - 1 टीस्पून

  • मीठ - चवीनुसार

Veg Spring Roll Recipe in Marathi

व्हेज स्प्रिंग रोल्सची कृती :

  • एक पॅन घ्या आणि त्यात थोडे तेल घाला. एक मिनिट ते तसेच राहू द्या. नंतर पॅनमध्ये चिरलेला कांदा आणि चिली सॉस घाला. कांदा एक मिनिट परतून घ्या.

  • आता पॅनमध्ये गाजर, कोबी आणि शिमला मिरची घाला. जर तुम्हाला तुमचे स्प्रिंग रोल पौष्टिक बनवायचे असतील तर तुम्ही तुमच्या रेसिपीमध्ये बीन्स देखील घालू शकता.

  • भाज्या सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्या. तुमची इच्छा असल्यास तुम्ही त्यात सोया सॉस आणि व्हिनेगर देखील घालू शकता.

  • भाज्या परतून घेतल्यावर त्यात मीठ, मिरपूड, मिरची पावडर आणि तुमच्या आवडीचे कोणतेही मसाले घालू शकता. रेसिपी करताना जास्त मीठ घालू नका. गॅस बंद करा आणि मिश्रण थंड होण्यासाठी बाजूला ठेवा.

  • याच्या मदतीने व्हेज स्प्रिंग रोलचे स्टफिंग तयार केले जाते. आता, रॅपर्स तयार करण्याची वेळ आली आहे. रॅपरसाठी एका भांड्यात मीठ, मैदा आणि कॉर्न फ्लोअर घ्या. त्यात पाणी घाला आणि फेटण्याच्या मदतीने चांगले मिसळा.

  • मिश्रण गुळगुळीत गाठीमुक्त तयार करा. रॅपर्सचा तयार झाले की त्यामध्ये भाजीचे फिलिंग टाका. त्यानंतर, पॅन गरम करा, त्यात थोडे तेल घाला आणि आवरण तळून घ्या. रॅपर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या.

  • केचपसोबत तयार आहेत गरमागरम स्प्रिंग रोल. (Veg Spring Roll Recipe in Marathi)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: डिचोली येथील बगलमार्गावर दरडीचा धोका; कोसळण्याची भीती वाढली, रेलिंगला अडकलेली दरड वर्षभर 'जैसे थे'

Yashasvi Jaiswal Fight: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! यशस्वी जयस्वाल श्रीलंकन गोलंदाजाच्या अंगावर गेला; डोकं आपटलं, धक्का दिला अन्... Watch Video

Sarmanas Pilgaon Road: सारमानस रस्त्यावरील धूळ-चिखलाच्या समस्येवरून प्रेमेंद्र शेट आक्रमक, खनिज वाहतूक रोखली

आरोप निश्चितीपूर्वी आरोपीची बाजू ऐकून घेणे बंधनकारक; उच्च न्‍यायालयाकडून सत्र न्यायालयाचा आदेश रद्द

Illegal Massage Parlours: मसाज पार्लरविरोधात लोबोंचे पत्र; कळंगुटमध्ये बेकायदा आस्थापने सुरू असल्याचे नमूद

SCROLL FOR NEXT