Veg Diet Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Heart Disease: हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी शाकाहार की मासांहार चांगला? महत्वाचं संशोधन आलं समोर

Veg Diet: जर तुम्ही तुमच्या डायटमध्ये जास्त शाकाहार आणि कमी मांसाहार करत असाल तर हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो.

Manish Jadhav

जर तुम्ही तुमच्या डायटमध्ये जास्त शाकाहार आणि कमी मांसाहार करत असाल तर हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो. चकित झालात ना? संशोधनात हे सिद्ध झाले आहे. इंग्लंड आणि स्कॉटलंडमध्ये केलेल्या संशोधनात असे दिसून आले आहे की, मांसाहार करणाऱ्यांच्या तुलनेत शाकाहारी लोकांमध्ये हृदयरोगामुळे मृत्यू होण्याचा धोका 32 टक्के कमी असतो. शाकाहारातील फायबर आणि मिनरल्स हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असतात. मांसाहाराच्या तुलनेत शाकाहारी आहारामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. यामुळे हृदयविकाराचा धोकाही कमी होतो.

दरम्यान, शाकाहारात सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाणही कमी असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. व्हेज डाएटमध्ये अँटीऑक्सिडंटचे प्रमाण जास्त असल्याने हृदयविकारांपासूनही बचाव होतो. इंग्लंड आणि स्कॉटलंडमधील सुमारे 45,000 लोकांच्या खाण्याच्या सवयींवर आधारित एका वर्षाच्या संशोधनानंतर असा दावा करण्यात आला आहे की, मांसाहारी आहारापेक्षा शाकाहारी आहार हा हृदयाच्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे. जर तुम्हाला तुमचे आरोग्य सुधारायचे असेल तर शाकाहार बेस्ट आहे.

प्लांट बेस्ड डाइट अधिक फायदेशीर

अमेरिकन हार्ट असोसिएशनचे म्हणणे आहे की, अॅनिमल-बेस्ड डायटच्या तुलनेत प्लांट बेस्ड डायटमुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. प्लांट बेस्ड डाइटमुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT