Vastu Tips for House Painting Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips for Home Painting : घराच्या भिंतींसाठी वापरा हे रंग; सदैव राहील लक्ष्मीची कृपा

Vastu Tips for House Painting : तुम्हीही नवीन घर बांधत असाल किंवा जुने घर रंगवण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी कोणता रंग योग्य असेल, हे वास्तूशास्त्रानुसार जाणून घ्या.

दैनिक गोमन्तक

Vastu Tips for House Painting : आपल्या आवडीचे घर मिळणे ही प्रत्येकाच्या आयुष्यातील मोठी इच्छा असते. त्यासाठी आपण भिंतींवर विविध प्रकारची आपल्या आवडीची रंगरंगोटीही करून घेतो. असे म्हटले जाते की वास्तूनुसार, घरी रंग लावल्याने सकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढतो आणि कुटुंबात आनंद येतो. तुम्हीही नवीन घर बांधत असाल किंवा जुने घर रंगवण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी कोणता रंग योग्य असेल, हे वास्तूशास्त्रानुसार जाणून घ्या. (Vastu Tips for House Painting)

आकाशी निळा रंग

वास्तूशास्त्रानुसार घरातील खोल्यांच्या रंगासाठी हलका निळा रंग योग्य मानला जातो. हा रंग तुम्ही घराच्या पश्चिम बाजूच्या भिंतीवरही लावू शकता. लक्षात ठेवा, गडद निळा रंग वापरू नका, तर तो आकाशी निळा रंग असावा.

घराचा उत्तरेकडील भाग पाण्याशी संबंधित असल्याचे मानले जाते. वास्तूनुसार उत्तर दिशेच्या भिंतींवर पिस्ता किंवा हिरवा रंग लावल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन कुटुंबावर धन-संपत्तीचा वर्षाव करते, अशी मान्यता आहे.

बेडरूममध्ये गुलाबी रंग वापरा

जर आपण बेडरूमबद्दल बोललो तर आपण त्यात गुलाबी आणि आकाशी रंग वापरू शकता. हे दोन्ही रंग सकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढवतात आणि घरामध्ये जिवंतपणा ठेवतात.

वास्तूनुसार, घराच्या आग्नेय दिशेला पिवळा, गुलाबी किंवा भगवा रंग लावणे शुभ मानले जाते. ही दिशा अग्नीशी संबंधित असल्याचे मानले जाते. त्यामुळे या दिशेला केवळ अग्नीशी संबंधित रंगच वापरावेत.

घराच्या मंदिरात हलका पिवळा रंग शुभ

घराच्या मंदिरात हलका गुलाबी, हलका पिवळा, पांढरा किंवा आकाशी रंग वापरणे चांगले मानले जाते. दुसरीकडे, घराच्या छतासाठी पांढरा रंग सर्वोत्तम मानला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

SCROLL FOR NEXT