Vastu Tips: Make this space in the house clean before Diwali, goddess Lakshmi will always blessing Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips: दिवाळीच्या आधी घरातील या जागा करा स्वच्छ

दिवाळी हा सण संपूर्ण भारतात आनंदाच्या वातावरणात साजरा केला जातो.

दैनिक गोमन्तक

दिवाळीचा (Diwali) सण कार्तिक महिन्याच्या अमावस्येला 4 नोव्हेंबरला साजरा केला जातो. दिवाळीमध्ये सर्वांची जल्लोषात तयारी सुरू असते. स्वच्छतेपासून ते खरेदीपर्यंत सर्व कामात लोक व्यस्त असतात. वास्तुनुसार धनाची देवी माँ लक्ष्मी घरात टिकून राहण्यासाठी या जागांची स्वच्छता करणे आवश्यक असते. चल तर मग जाणून घेवूया घरातील कोणत्या आहेत या जागा.

* ज्या घरात स्वच्छता आणि प्रकाश असतो त्या घरात देवी लक्ष्मी वास करते. यामुळे घरात स्वच्छता ठेवावी. धनत्रयोदशी आणि दिवाळीसाठी वास्तुशास्त्रात अनेक गोष्टी नमूद केलेल्या आहेत,ज्यांचे आपण पालन करणे आवश्यक आहे.

* वास्तुशास्त्रानुसार, घरातील सर्वात महत्वाचे स्थान ईशान्य आहे. हे देवतांचे स्थान मानले जाते. या दिशेला स्वयंपाकघर आणि मंदिर असते.धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या दिवशी ईशान्य कोपरा पूर्णपणे स्वच्छ करावा. या ठिकाणी अनावश्यक वस्तु ठेवणे टाळावे. जर घराचा ईशान्य कोपरा स्वच्छ असेल तर लक्ष्मी, भगवान धन्वंतरी आणि कुबेर यांच्या कृपेने घरात नेहमी सुख आणि समृद्धी राहते.

*सूर्य पूर्व दिशेने उगवतो आणि घरात सकारात्मक तेचा संवाद देखील या दिशेने होतो. त्यामुळे घराची पूर्व दिशा नेहमी स्वच्छ असावी. धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या दिवशी सकाळी लवकर उठून घराची पूर्व दिशा स्वच्छ करावी.

* घरातील ब्रम्ह स्थान देखील महत्वाचे आहे. घरच्या मधल्या भागाला ब्रह्मस्थान म्हणतात. ही जागा नेहमी उघडी आणि शक्य असल्यास हवेशीर ठेवावी. जड फर्निचर किंवा यांवश्यक वस्तु येथे ठेवणे टाळावे. तसेच या ठिकाणी तुटलेले फर्निचर ठेवू नये. विशेष म्हणजे दिवाळी आणि धनत्रयोदशीला या वस्तु ठेवणे टाळावे.घरामधील या तिन्ही जागा स्वच्छ राहिल्यास घरात लक्ष्मीचा वास नेहमी राहतो. तसेच घरात आरोग्य, सुख-शांती आणि समृद्धी टिकून राहते. घरातील सर्व सदस्यांची प्रगती होण्याची शक्यता असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Cyber Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

SCROLL FOR NEXT