Vatu Tips: घरातील भिंतीना शुभ दिल्याने सुख-समृद्धी लाभते  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips: घरातील भितींना शुभ रंग दिल्याने सुख-समृद्धी लाभते

वास्तुशास्त्रात रंगांनाही विशेष महत्व दिले आहे.

दैनिक गोमन्तक

प्रत्येक महिलेची एकच इच्छा असते की घरात सुख-शांती (Happiness) लाभावी. घरातील प्रत्येक सदस्य निरोगी (Healthy) राहावे. पण महिलांना अनेकदा घरातल्या कोणत्या ना कोणत्या गोष्टीबद्दल ताण येतोच. कधी घरातील सदस्यांना आरोग्याची समस्या असते, तर कधी घरातील (Home) छोट्या-मोठ्या गोष्टीमुळे त्रास होतो. जर घराची पूर्ण काळजी घेवून सुद्धा समस्या कायम राहत असेल तर वास्तुदोष असू शकतो. यामुळे वास्तुशास्त्रानुसार घराची व्यवस्था केल्याने कुटुंबात सुख-शांती कायम राहते. वास्तुशास्त्रात रंगांनाही विशेष महत्व दिले आहे. चला तर मग जाणून घेऊया घरातील भिंतीना कोणता रंग द्यावा.

प्रत्येक दिशेला वेगळा रंग दिल्यास वेगळा प्रभाव पडतो

वास्तुनुसार वेगवेगळ्या भिंतीना वेगवेगळा रंग दिल्यास त्याचा घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक दिशेला एक विशिष्ट रंग असतो. जो त्या दिशेच्या देवतांशी संबंधित असतो.तसेच प्रत्येक दिशा काही ग्रह दर्शवत आणि त्या दिशेने विशिष्ट रंगाचा वापर शुभ किंवा अशुभ असतो. जेव्हा घराला रंग द्यायचा असतो तेव्हा महिलांची भूमिका विशेष असते. तुम्ही जेव्हा तुमच्या घरासाठी रंगाची निवड कराल तर सकारात्मक ऊर्जा निर्माण करणाऱ्या रंगाची निवड करावी. यामुळे तुमचे घर सुंदर तर दिसणारच पण घराला सुख- समृद्धी सुद्धा लाभेल.

* पूर्व दिशा: ही दिशा सूर्याची दिशा मानली जाते. या दिशेने तपकिरी रंग द्यावा,जो शुद्धतेचे प्रतीक आहे. तुम्ही हिरवा किंवा पिस्ता रंग सुद्धा देवू शकता.

* पश्चिम दिशा: या दिशेला शनीची दिशा मानली जाते. म्हणून राखाडी रंग या दिशेने वापरावा. हा रंग समाधानतेच प्रतीक आहे.

* उत्तर दिशा: या दिशेचा स्वामी बुध आहे. या दिशेला हिरव्या रंगाचा वापर करणे शुभ मानले जाते. तुम्ही येथे निळा रंग देखील वापरू शकता.

* दक्षिण दिशा: या दिशेचा स्वामी मंगळ आहे. लाल रंग या दिशेसाठी शुभ मानला जतो. यामुळे घरात उत्साह आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तुम्ही जाभळा रंग सुद्धा वापरू शकता.

* बेडरूममध्ये हे रंग शुभ मानले जाते

वास्तुशास्त्रानुसार घराच्या बेडरूममधील रंगाचा तुमच्या जीवनावर खूप परिणाम होतो. घरासोबत जर तुम्ही बेडरूमला रंग वास्तुनुसार दिल्यास तुमच्या आयुष्यात आनंद कायम राहते. तसेच आरोग्य देखील चांगले राहते. जर तुम्ही विवाहित असाल तर तुमच्या मधील प्रेम टिकून राहते.

* लाल आणि गुलाबी रंग

लाल रंग प्रेमाच प्रतीक आहे. यामुळे प्रत्येक घराला फायदा होतो. वास्तुशास्त्रानुसार लाल आणि गुलाबी रंग बेडरूमसाठी शुभ मानला जातो. कारण यामुळे तुमच्या जोडीदाराशी असलेले संबंध अधिक दृढ होते.

* हिरवा

हिरवा रंग सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. वास्तुशास्त्रानुसार हिरवा रंग बेडरूमसाठी शुभ मानला जातो. हा रंग ज्ञानाचे प्रतीक आहे. यामुळे हा रंग लहान मुलांच्या रूममध्ये सुद्धा शुभ मानला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Brock Lesnar Retirement: 10 वेळचा WWE वर्ल्ड चॅम्पियन ब्रॉक लेसनर निवृत्त; म्हणाला, 'योग्य वेळी थांबण्याचा निर्णय...'

Goa Politics: भाजपने गोव्याला केले ‘नशायुक्त’ राज्य; भाजप सरकारवर काँग्रेसचा घणाघाती आरोप

Horoscope: गुरुवार ठरणार खास! 'या' राशींना नोकरी-व्यवसायात मोठं यश, धनलाभ आणि प्रगतीचे प्रबळ संकेत

Goa Fast Track Immigration: गोव्यात सुरू होणार 'फास्ट ट्रॅक इमिग्रेशन'; गृहमंत्री अमित शहा आणि पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

Arpora Nightclub Fire: कोर्टाचा आदेश धुडकावणे सचिवांना पडले महाग! बर्च अग्निकांड प्रकरणी 4 ग्रामपंचायतींने उत्तर दाखल न केल्याने हजेरीचे निर्देश

SCROLL FOR NEXT