Vastu Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips: हिवाळ्यात 'हे' 4 उपाय केल्यास मिळेल करिअरमध्ये यश

Winter Vastu Tips: हिवाळ्यात वास्तुशास्त्रानुसार काही बदल केल्यास करिअरमध्ये यश मिळू शकते.

Puja Bonkile

Vastu Tips For Winter Days: डिसेंबरमध्ये हवामानात बरेच बदल होतात. तापमानात घट होताच हिवाळा सुरू होतो. थंड हवामान आपल्यामध्ये अनेक बदल घडवून आणते.

अशावेळी वास्तूनुसार घरासोबतच व्यक्तीने आपल्या खाण्याच्या सवयी, कपडे आणि दैनंदिन दिनचर्येत काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे.

नकळत तुमच्याकडून झालेली कोणतीही चूक तुमच्या आरोग्यावर तसेच तुमच्या संपत्तीवर नकारात्मक परिणाम करू शकते. हिवाळ्यात आपण सावधगिरी बाळगली पाहिजे आणि काही विशेष उपाय केले पाहिजे. यामुळे समृद्धी येते आणि आरोग्य देखील सुधारते.

घरातील पडद्यांची काळजी घ्या

थंडीपासून बचाव करण्यासाठी लोक दारे किंवा खिडक्यांवर जाड पडदे लावतात. पण वास्तूनुसार असे करणे योग्य मानले जात नाही. कारण यामुळे सूर्यप्रकाश घरात प्रवेश करू शकत नाही. सूर्यप्रकाशामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते.

या गोष्टींचे दान करावे

हिवाळ्यात अनेकदा आपण आपल्या खाण्याच्या सवयींबाबत काळजी घेत नाही. हिवाळ्यात आरोग्यासोबत समृद्धी हवी असेल तर तूप आणि गुळाचे जास्तीत जास्त सेवन करावे. गुळाचा संबंध सूर्याशी आहे. गुळाचे सेवन करून त्याचे दान केल्याने मान, धन आणि शक्ती वाढते. याशिवाय गरजू लोकांना या वस्तू दान कराव्या. हा उपाय ग्रहांच्या अशुभ प्रभावापासून तुमचा बचाव करेलच पण तुमच्या संपत्तीतही वाढ होईल.

धूप लावावे

हिंदू धर्मात घरात धूप लावण्याला खुप महत्व आहे. हिवाळ्यात थंडीमुळे सूर्यप्रकाश कमी होतो आणि घरांमध्ये अंधारामुळे नकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढतो. ज्यामुळे कौटुंबिक त्रास, मानसिक तणाव, रोग यासारख्या समस्या उद्भवतात. अशावेळी हिवाळ्यात सकाळी आणि संध्याकाळी धूप लावावे. त्याचा सुगंध घरभर पसरतो. यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.

शेकोटी

जरी आता लोक कडाक्याच्या थंडीत त्यांच्या घरात हिटर वापरतात, परंतु ज्या घरांमध्ये अजूनही थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोटी पेटवली जाते, त्यांनी दिशा लक्षात ठेवली पाहिजे. शेकोटी नेहमी वायव्य दिशेला किंवा अग्निकोनात पेटवावी. असे न केल्यास चुलीशी संबंधित वास्तू दोष निर्माण होऊन कुटुंबाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

Delhi Protest: आंदोलकांचा धूर अन् लोकशाहीचे अश्रू! 'क्रॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाने फाडला व्यवस्थेचा बुरखा; जे. पी. नड्डांची मध्यस्थी ठरली उशिराची अक्कल?

History Of Hunger Strike in India: गांधीजींच्या सत्याग्रहापासून वांगचूक यांच्या उपोषणापर्यंत! भारतातील 'अहिंसक शस्त्रा'चा संघर्ष अन् सरकार समोरील मोठे आव्हान

खरी कुजबुज: ‘वाळवी’ने पेटवलेला वणवा

Narendra Sawaikar Post Controversy: तरुणांना 'वाळवी' संबोधल्याने गोव्यात राजकीय रणसंग्राम! सावईकरांच्या विधानावर काँग्रेस आक्रमक; माफी मागा, अन्यथा...

SCROLL FOR NEXT