Vastu Tips For Purse Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips For Purse: पर्समध्ये कोणत्या गोष्टी ठेवणे मानले जाते अशुभ,वाचा वास्तुशास्त्र काय सांगतं

अनेक लोक मेहनत करून देखील त्यांना फायदा मिळत नाही.

Puja Bonkile

Vastu Tips For Purse: वास्तुशास्त्रात घरात ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीचे महत्व सांगितलेले आहे. वास्तुनुसार अनेक व्यक्तींची आर्थिक परिस्थिती ही त्यांच्या पर्समध्ये असलेल्या गोष्टींमुळे होते.

पर्ससंबंधित असलेले वास्तु नियम पाळल्यास अनेक आर्थिक समस्या दूर होऊ शकतात. यामुले पर्समध्ये ठेवलेल्या काही गोष्टी तुमच्या आर्थिक संकटाचे कारण बनु शकते. चला तरमग जाणून घेऊया कोणत्या वस्तु पर्समध्ये ठेवणे टाळावे.

  • जुने बिल

वास्तुशास्त्रानुसार चुकूनही पर्समध्ये जुने बिल ठवू नये. कारण असे केल्याने तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते. पर्समध्ये अनावश्यक वस्तू ठेवल्याने माता लक्ष्मी नाराज होऊ शकते. पर्समध्ये ठेवलेला जुना कागद हळूहळू कचरा होऊ लागतो. वास्तुशास्त्रानुसार पर्समध्ये टाकाऊ कागद ठेवल्याने पैसे पर्समध्ये राहत नाही. पर्समध्ये ठेवलेल्या अनावश्यक बिलांमुळे आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात. 

  • कोणत्याही व्यक्तीचा फोटो

पर्समध्ये कधीही जिवंत किंवा मृत व्यक्तीचा फोटो ठेवू नये. वास्तूनुसार पर्समध्ये कोणत्याही देवाचे फोटो कधीही ठेवू नका. अशी फोटो पर्समध्ये ठेवणे अशुभ मानले जाते. असे केल्याने वास्तुदोष वाढतात. पर्समध्ये माता लक्ष्मीचा वास असतो असे मानले जाते. 

  • पैसे कसे ठेवावे

पर्समध्ये कधीही पैशांची सैल ठेवणे केव्हाही चांगले. पर्समध्ये नोटा आणि नाणी कधीही एकत्र ठेवू नयेत. पर्समध्ये नेहमी नाणी आणि नोटा वेगळ्या खिशात ठेवावे.

  • चावी

वास्तुशास्त्रानुसार चाव्या कधीही पर्समध्ये ठेवू नयका. वास्तुशास्त्रानुसार पर्समध्ये चाव्या ठेवल्याने व्यक्तीच्या जीवनात दारिद्य येऊ शकते. त्यामुळे चुकूनही चाव्या पर्समध्ये ठेवू नका. चावी ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येते असे मानले जाते.

  • फाटलेली नोट

वास्तुशास्त्रानुसार फाटलेल्या नोटा कधीही पर्समध्ये ठेवू नका. तुमच्या पर्समध्ये आधीच फाटलेली नोट असेल तर ती बदलून घ्यावी. फाटलेली पर्स देखील वापरू नका. फाटलेली पर्स वारल्याने माता लक्ष्मीचा कोप होतो असे मानले जाते.

  • उधार घेतलेले पैसे

वास्तूनुसार उधार घेतलेले पैसे कधीही पर्समध्ये ठेवू नका. असे मानले जाते की उधार घेतलेले पैसे पर्समध्ये ठेवल्याने कर्जाचा बोजा वाढतो आणि आर्थिक नुकसानही होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT