Vastu Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips: घरात झाड लावताना कोणत्या दिशेला लावावे, वाचा एका क्लिकवर

वास्तुशास्त्रात घरात कोणती झाड कोणत्या दिशेला लावावी हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये रोपे लावताना कोणत्या दिशेला लावावे हे सांगितले आहेत. घरात झाडे लावल्याने घराचे सौंदर्य अधिक वाढते. परंतु काही गोष्टींची काळजी घेतल्यास घरातील वास्तूदोष दूर होऊन घरात सुख, समृद्धी लाभते. घरात झाड लावताना दिशेकडे लक्ष द्या आणि चुकीच्या दिशेने कोणतेही झाड लावू नका. वास्तूनुसार असे केल्याने तुमच्या जीवनावर नकारात्मक प्रभाव पडतो.

  • पूर्व किंवा ईशान्य दिशेला लावा ही झाड

वास्तूनुसार तुळस, केळी, आवळा, झेंडू, शमी, हिरवे गवत, मनी प्लांट, धणे, हळद, कमळ आणि पुदिना पूर्व किंवा उत्तर-पूर्व दिशेला लावावे. घरात हे झाडे लावणे शुभ मानले जाते. असे मानले जाते की ही झाडे लावल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात आणि घरात माता लक्ष्मी वास करते.

  • उत्तर दिशा

वास्तूनुसार घराच्या उत्तर दिशेला निळी फुले देणारी झाडे लावावीत. असे मानले जाते की असे केल्याने व्यक्तीच्या जीवनात सकारात्मकता वाढते आणि घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते आणि करिअरमध्येही भरपूर यश मिळते.

  • ही झाडे दक्षिण किंवा पश्चिम दिशेला लावावी

वास्तुशास्त्रानुसार पिंपळाचे झाड घरापासून लांब पश्चिमेकडे मोकळ्या जागेत लावावे. या दिशेला मोगरा आणि चमेलीची फुले लावणे शुभ मानले जाते. असे मानले जाते की असे केल्याने जीवनात प्रगतीच्या अनेक संधी मिळतात आणि जीवन सुख-समृद्धी लाभते.

  • उत्तर-पश्चिम दिशा

वास्तूनुसार घराच्या उत्तर-पश्चिम दिशेला बेलाचे झाड लावणे खूप शुभ असते. असे मानले जाते की या दिशेला बेलाचे रोप लावल्याने घरातील नकारात्मकता दूर होते. वास्तू दोषांपासून मुक्ती मिळते आणि सुख आणि सौभाग्य वाढते.

  • दक्षिण-पूर्व दिशा

असे मानले जाते की लाल फुले देणारी झाडे घराच्या आग्नेय दिशेला लावावीत. ही रोपे घरात लावल्याने समाजात व्यक्तीचा मान, प्रतिष्ठा आणि कीर्ती वाढते.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबूज: खोलकरही नांगी टाकणार?

Sheikh Hasina Press Conference: 'मी जेल आणि मृत्यूला घाबरत नाही!', शेख हसीना यांचा मायदेशी परतण्याचा थेट इशारा; भारतातील पत्रकार परिषदेने उडवली खळबळ

Goa Politics: 'आरजी'कडून निलंबित खोलकरांना चौकशीसाठी नोटीस; 7 ऑगस्‍टला हजर राहण्‍याचे निर्देश

Accident Death: भीषण अपघात! माशेल येथे जीपची दुचाकीला जोरदार धडक; सावंतवाडीतील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Goa Apostille Process: परदेशात जाणाऱ्या गोवेकरांसाठी खूशखबर! कागदपत्रांच्या पडताळणीची प्रक्रिया झाली सुलभ; सरकारकडून 'SOP' जाहीर

SCROLL FOR NEXT