Vastu Tips For Plants Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips For Plants : सूर्यास्तानंतर झाडांशी करू नका छेडछाड; होईल मोठे नुकसान, वाचा सविस्तर

Vastu Tips For Plants : पुराणामध्ये, झाडे आणि वनस्पतींना मानवासारखे सजिव मानले गेले आहे

दैनिक गोमन्तक

Vastu Tips For Plants : धर्मात अशा अनेक परंपरा आहेत, ज्या आज शतके उलटून गेल्यानंतरही चालू आहेत. या परंपरांमागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारणे आहेत, जी एवढा काळ लोटूनही आजही करोडो लोकांना मार्गदर्शन करत आहेत.

अशीच एक महान परंपरा म्हणजे रात्रीच्या वेळी झाडांची पाने न तोडणे आणि त्यांच्याशी छेडछाड न करणे. याचे कारण तुम्हाला माहीत आहे का? नसेल तर हरकत नाही. आज आम्ही तुम्हाला त्याची कारणे सविस्तर सांगत आहोत. (Vastu Tips For Plants)

झाडे आणि वनस्पती हे माणसासारखेच सजिव आहेत

पुराणामध्ये, झाडे आणि वनस्पतींना मानवासारखे सजिव मानले गेले आहे, जे दिवसा उठतात आणि सूर्यास्तानंतर विश्रांती घेतात. त्यामुळे त्यांच्या रात्रीच्या विश्रांतीमध्ये अडथळा आणणे आणि झोपलेले असताना त्यांना उठवणे हे शास्त्राच्या विरुद्ध मानले जाते. हेच कारण आहे की सूर्यास्तानंतर, कुटुंबातील वडीलधारी माणसे झाडांना छेडण्यास आणि त्यांची पाने तोडण्यास नकार देतात.

अंधार पडल्यानंतर झाडांना छेडछाड न करण्याचे एक कारण म्हणजे झाडांवर पक्षी आणि छोटे कीटक असतात. अशा परिस्थितीत रात्रीच्या वेळी झाडाला हलवल्यास किंवा त्यांची पाने तोडल्यास पक्ष्यांच्या झोपेत अडथळा येतो आणि ते अस्वस्थ होतात. त्याचे परिणाम तुम्हाला दुसऱ्या स्वरूपात भोगावे लागतात.

रात्री झाडे कार्बन डायऑक्साइड वायू सोडतात

रात्री उशिरानंतर झाडांची पाने न तोडण्यामागे शास्त्रीय कारणेही आहेत. खरं तर, रात्री, ऑक्सिजनऐवजी, झाडे कार्बन डायऑक्साइड सोडू लागतात. अशा परिस्थितीत मानवाने अंधारात झाडा-झाडांच्या खाली गेल्यास त्यांना ऑक्सिजनच्या कमतरतेचा सामना करावा लागू शकतो. यामुळेच रात्री झाडाखाली झोपणे आणि त्यावर चढणे निषिद्ध आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT