Vastu Tips For Home Dainiik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips For Home: कमी पैशात असे दूर करा घरातील वास्तुदोष

Home Vastu Tips: घरातील वास्तुदोष कमी करण्यासाठी तुम्ही पुढिल उपाय करू शकता.

Puja Bonkile

Vastu Tips For Home: स्वतःचे घर असणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. प्रत्येकजण आपले घर त्याच्या इच्छेनुसार डिझाइन करतो. पण कधी कधी एखादी छोटीशी चूक वास्तुदोषाचे कारण बनते.

घरातील वास्तुदोषांमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशावेळी वास्तुत सांगितलेले उपाय करून घरातील वास्तुदोष सहज दूर करू शकता.

वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक दिशा कोणत्या ना कोणत्या घटकाचे प्रतिनिधित्व करते. आपले शरीर जसे बनलेले आहे तसेच आपले संपूर्ण घर हे पाच घटकांनी बनलेले आहे.

या कारणास्तव, आनंदी आणि समृद्ध जीवन जगण्यासाठी, घराचा प्रत्येक कोपरा दोषांपासून मुक्त असावा. कारण त्याचे दुष्परिणाम माणसाच्या जीवनावर सर्वात जास्त परिणाम करतात. 

घरातील वास्तुदोष कसे दूर करावे

कलश ठेवावे

घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी ईशान्य दिशेला म्हणजेच ईशान्य कोपऱ्यात कलश ठेवावे. कारण कलश हे गणेशाचे रूप मानले जाते. अशावेळी गणेशाची कृपा तुमच्यावर राहिल आणि तुम्हाला प्रत्येक अडचणीतून मुक्ती मिळवून देतील.

स्वस्तिक

घरातील वास्तू दोष दूर करण्यासाठी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कुंकु लावून स्वस्तिक बनवावे. असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जाही नाहीशी होते.

पंचमुखी हनुमानजींचे फोटो

जर तुमचे प्रवेशद्वार दक्षिण दिशेला असेल तर घराच्या प्रवेशद्वारावर पंचमुखी हनुमानाचा फोटो ठेवावा. प्रवेशद्वारात पंचधातूपासून बनवलेला पिरॅमिड लावणे शुभ मानले जाते. यामुळे शुभ परिणामही मिळतात.

एक दिवा लावा

जर तुमचे स्वयंपाकघर आग्नेय कोपऱ्यात म्हणजेच पूर्व-दक्षिण दिशेला नसेल तर त्यामुळे वास्तुदोष होऊ शकतात. अशावेळी वास्तू दोष दूर करण्यासाठी आग्नेय कोपऱ्यात एक छोटा दिवा ठेवा आणि तो रोज लावावा. यामुळे स्वयंपाकघरातील वास्तुदोष बऱ्याच अंशी कमी होतील.

कपूर

घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठीही कापूर फायदेशीर ठरू शकतो. घरामध्ये वास्तुदोष असलेल्या ठिकाणी कापूर ठेवा.  यामुळे वास्तू दोष दूर होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT