Vastu Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips: घरात तांब्याचा सुर्य कुठे अन् कसा लावावा? वाचा वास्तुशास्त्र काय सांगतं

घरात तांब्यापासून बनवलेला सुर्य कोणत्या दिशेने लावावा याबाबत वास्तुशास्त्रात सविस्तर माहिती दिलेली आहे.

Puja Bonkile

Vastu Tips: वास्तूनुसार घराच्या सजावटीमध्ये काही खास फोटो, फुलं आणि रंगांची विशेष काळजी घेतल्याने घराच्या सौंदर्यासोबतच सुख आणि सौभाग्यही वाढते. सुख-शांतीसाठी तांब्यापासून बनवलेला सूर्य घरात बसवणे खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि व्यक्तीचे भाग्य सूर्यासारखे चमकू लागते. जीवनात धन-संपत्तीची कमतरता नसते आणि व्यक्ती प्रगतीच्या मार्गावर पुढे जात राहतो. परंतु घरात तांब्याचा सूर्य बसवण्यापूर्वी वास्तूविषयी काही गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे.

  • कोणते नियम पाळावे

  1. वास्तूनुसार घराच्या पूर्व दिशेला तांब्याचा सूर्य ठेवणे खूप शुभ मानले जाते.

  2. तुम्ही घराच्या दारावर किंवा खिडकीवर लावू शकता. तसेच तुम्ही भिंतीवर देखील लावू शकता.

  3. पूजेच्या खोलीत उत्तर-पूर्व दिशेला तांब्याचा सूर्य लावणे फायदेशीर मानले जाते.

  4. लिविंग रूममध्ये तांब्याचा सूर्य ठेवल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी येते.

  5. नोकरी-व्यवसायात प्रगतीसाठी ऑफिसच्या पूर्वाभिमुख भिंतीवर तांब्याचा सूर्य लावू शकता.

  6. वास्तूनुसार घराच्या बेडरूममध्ये तांब्याचा सूर्य ठेवू नका. कारण असे करणे अशुभ मानले जाते.

  7. तांब्यापासून बनवलेल्या सुर्याची स्वच्छता करताना विशेष काळजी घ्या. कारण स्वच्छ असेल तरच घरात सकारात्मकता टिकून राहते.

तांब्याचा सूर्य लावल्याने कोणता फायदा होतो

मान-सन्मान मिळतो

असे मानले जाते की तांब्यापासून बनवलेला सूर्य धारण केल्याने व्यक्तीला समाजात खूप मान-सन्मान मिळतो आणि आरामात राहतो.

नातं घट्ट होतं

असे मानले जाते की वास्तूचे नियम लक्षात ठेवून तांब्यापासून बनवलेला सूर्य घरात ठेवल्याने व्यक्तीचे आकर्षण वाढते आणि नातेसंबंध सुधारतात.

आर्थिक समस्या दूर होतात

वास्तूनुसार ऑफिसमध्ये तांब्याचा सूर्य ठेवल्याने काम आणि बिझनेसमध्ये यश मिळते आणि सूर्यदेवाचा आशीर्वाद मिळतो. ज्यामुळे व्यक्तीची आर्थिक स्थिती मजबूत होते.

सकारात्मकता वाढते

तांब्यापासून बनवलेला सूर्य घरातील सकारात्मक उर्जा वाढवते. ज्यामुळे घरात आनंदी वातावरण राहते आणि घरातील त्रासांपासून मुक्ती मिळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT