Vastu Tips For Study Room Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips For Study Room: स्मरणशक्ती तीक्ष्ण करण्यासाठी मुलांच्या स्टडी रूममध्ये 'हे' रंग वापरावे

वास्तुशास्त्रानूसार स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत.

Puja Bonkile

Vastu Tips For Study Room: वास्तुशास्त्रामध्ये घरासाठी अनेक उपाय सांगितले आहेत. यामुळे घरात सुख-शांती नांदते. तसेच अनेक गोष्टींसाठीही उपाय सांगितले आहेत. घरातील मुलांची स्टडी रूम कशी असावी रूमला कोणता रंग असावा यासाठीही उपाय सांगितले आहेत.

जर तुमच्या मुलाचेही अभ्यासात मन लागत नसेल तर वास्तुत सांगितलेल्या उपायांचा वापर करू शकता.

मुलांची स्टडी रूम ही एक असी जागा जिथे शांततेत, कोणताही आवाज आणि हस्तक्षेप न करता अभ्यास करू शकतो आणि या सर्व गोष्टींसाठी स्टडी रूमचे वातावरण चांगले आणि शांत असणे गरजेचे असते.

स्टडी रूम वाचनीय बनवण्यातही रंग महत्त्वाची भूमिका बजावतात. चला तर मग जाणून घऊया की या रूमला कोणता रंग द्यावा

स्टडी रूमसाठी हलके रंग वापरणे वास्तुशास्त्रानुसार शुभ मानले जाते. स्टडी रूमसाठी क्रीम कलर, फिकट जांभळा, फिकट हिरवा, आकाशी निळा, पिवळा किंवा तपकिरी रंग वापरावे. 

कारण वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून लाइट रंग शुभ मानला जातो. विशेषतः पिवळा रंग स्टडी रूमला लावल्यास मुलांची अभ्यास करण्याची क्षमता वाढवण्यास मदत मिळते. 

  • वास्तूशास्त्रानुसार घरासाठी कोणता रंग योग्य

1. आकाशी निळा रंग

वास्तूशास्त्रानुसार घरातील खोल्यांच्या रंगासाठी हलका निळा रंग योग्य मानला जातो. हा रंग तुम्ही घराच्या पश्चिम बाजूच्या भिंतीवरही लावू शकता. लक्षात ठेवा, गडद निळा रंग वापरू नका, तर तो आकाशी निळा रंग असावा.

घराचा उत्तरेकडील भाग पाण्याशी संबंधित असल्याचे मानले जाते. वास्तूनुसार उत्तर दिशेच्या भिंतींवर पिस्ता किंवा हिरवा रंग लावल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन कुटुंबावर धन-संपत्तीचा वर्षाव करते, अशी मान्यता आहे.

2. बेडरूममध्ये गुलाबी रंग वापरा

जर आपण बेडरूमबद्दल बोललो तर आपण त्यात गुलाबी आणि आकाशी रंग वापरू शकता. हे दोन्ही रंग सकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढवतात आणि घरामध्ये जिवंतपणा ठेवतात.

वास्तूनुसार, घराच्या आग्नेय दिशेला पिवळा, गुलाबी किंवा भगवा रंग लावणे शुभ मानले जाते. ही दिशा अग्नीशी संबंधित असल्याचे मानले जाते. त्यामुळे या दिशेला केवळ अग्नीशी संबंधित रंगच वापरावेत.

3. घराच्या मंदिरात हलका पिवळा रंग शुभ

घराच्या मंदिरात हलका गुलाबी, हलका पिवळा, पांढरा किंवा आकाशी रंग वापरणे चांगले मानले जाते. दुसरीकडे, घराच्या छतासाठी पांढरा रंग सर्वोत्तम मानला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT