5 Vastu Tips For Career Dainik Gomantak
लाइफस्टाइल

5 Vastu Tips For Career: 'हे' वास्तु उपाय केल्यास मिळेल करिअरमध्ये यश

अनेकवेळा असे होते की झोकुन काम केले तरीही अपयशाला सामोरे जावे लागते.

दैनिक गोमन्तक

5 Vastu Tips For Career: वास्तुशास्त्रात घरासाठी, मंदिरासाठी, करिअरसाठी अनेक उपाय सांगितले असतात. जर तुम्हाला झोकुन काम करुनही अपयशाला सामोरे जावे लागत असेल तर वास्तुच्या काही टिप्स फॉलो केल्यास मदत होइल.

तुम्हाला जर करिअरमध्ये यश हवे असेल तर जास्तीत जास्त कामवर भर देणे गरजेचे असते. रोज सकाळी उठून ऑफिसची तयारी करणे आणि वेळेवर ऑफिसला पोहोचणे, पोहोचल्यावर आपल्या कामात झोकून देणे इतके काय ते आपल्या हातात असतं.

अनेकदा काही व्यक्तींच्या बाबतीत त्यांनी झोकून देऊन काम केल्यावरही अपयशाचा सामना करावा लागत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. याला कारण वास्तुदोषही असू शकतो. आज आपण ऑफिससंबंधीत वास्तू कशी असावी किंवा तुमच्या बसण्याची जागा कोणती असावी हे जाणुन घेणार आहोत.

  • करिअरच्या दृष्टीने कशी असावी वास्तू

करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी उर्जेचा समतोल राखणे महत्त्वाचे आहे. यामुळे जीवनात यश आणि समृद्धी येऊ शकते. यासाठी वास्तूशास्त्रात सांगितलेल्या नियम लक्षात ठेवावे.

  • कॅबिनची दिशा

कॅबिनची दिशा आपल्या कामावर परिणाम करु शकते. जर ऑफिसमध्ये तुमचे कॅबिन असेल तर त्या कॅबिनची दिशा उत्तर, ईशान्य किंवा पूर्व दिशेला असावी. यामुळे तुमची निर्णय क्षमता वाढीस लागेल आणि तुमचे निर्णय योग्य ठरतील. याशिवाय कागदपत्र ठेवण्याच्या दृष्टीनेही या दिशा महत्वाच्या आहेत.

Office
  • डेस्कची दिशा कोणती असावी

तुम्ही ज्या डेस्कवर बसता ती दिशा उत्तर, ईशान्य किंवा पूर्व दिशेला असावी. हे तुम्हाला तुमची उत्पादकता वाढवण्यासाठी आणि तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करण्यास मदत करेल. दुसरीकडे, इतर दिशांना बसून, कामात लक्ष लागणार नाही किंवा हातून चुकाच होत राहु शकतात.

  • क्रिस्टल ठेवावे

तुमच्या ऑफिसमध्ये एखादे क्रिस्टल ठेवावे. यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढीस लागेल आणि तुमच्या हातून चांगले काम होईल. याशिवाय तुम्ही डेस्कवर बांबूचे रोपही ठेवू शकता. हे दिसायलाही चांगले असुन सकारात्मकता पसरवते.

  • डेस्क आणि सभोवताली स्वच्छता

वास्तूनुसार तुम्काही जेथे काम करता तेथे स्वच्छता ठेवावी. स्वच्छतेचा अभाव असल्यास तुमच्या प्रगतीतील अडथळ्याचे प्रमुख कारण असते. ऑफिसमध्ये (Office) तुम्ही ज्या ठिकाणी बसता त्या ठिकाणच्या स्वच्छतेची काळजी घ्या. तसेच स्वच्छ ठिकाणीच लक्ष्मी वास करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT