Vastu tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips: घराच्या मुख्य दारावर करा 'हे' एक काम, दूर होतील आर्थिक समस्या

घरात वास्तुनुसार बदल केल्यास अनेक समस्या दूर होण्यास मदत मिळते.

Puja Bonkile

vastu tips do these remedies for entrance prosperity happy life

घरात वास्तुनुसार बदल केल्यास अनेक समस्या दूर होण्यास मदत मिळते. तसेच घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूमध्ये एक विशेष ऊर्जा असते ज्याचा घरातील सदस्यांवर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होत असतो. त्यामुळे प्रगतीत अनेक समस्या येत असतात. 

घरामध्ये वास्तुदोष असल्यास व्यक्तीला नेहमी आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. खूप मेहनत करूनही कामात यश मिळत नाही. सतत प्रयत्न करूनही घरात पैशांची कमतरता राहते. वास्तू दोष घरातील शांती, सुख आणि समृद्धीवर परिणाम करतात. हे वास्तू दोष घराच्या मुख्य प्रवेशद्वाराशीही संबंधित असू शकतात. 

कोणत्या समस्या येतात

घरामध्ये वास्तुदोष असेल तर नकारात्मक ऊर्जा घरात वास करते. ज्या घरात वास्तुदोष असतो, त्या घरातील सदस्य आजारपण, आर्थिक संकट किंवा कुटुंबातील वादाने त्रासलेले राहतात. 

वास्तुदोषांमुळे होणाऱ्या या समस्यांमुळे घरात कधीही चांगल्या गोष्टी होत नाही. वास्तूनुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर काही बदल करून तुम्ही या समस्या दूर करू शकता.

  • मुख्य दारावर करा हे बदल

नियमितपणे सकाळी घराच्या मंदिरात उदबत्ती लावावी. थोड्या पाण्यात हळद मिक्स करावी आणि हे पाणी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर टाकावे. यानंतर, दरवाजाच्या दोन्ही बाजूंनी स्वच्छ पाणी टाकावे. असे केल्याने नकारात्मक ऊर्जी घराबाहेर जाते आणि घरात सकारात्मक ऊर्जा वास करते. मुख्य प्रवेशद्वारावर हळदीचे पाणी टाकल्याने वास्तुदोष दूर होण्यास मदत मिळते. 

वास्तूनुसार घराचे मुख्य दार नेहमी स्वच्छ असावे. मुख्य दारावर घाण असेल तर माता लक्ष्मी कधीच येत नाही. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कृष्ण किंवा गणेशाचा फोटो लावणे शुभ मानले जाते. यामुळे कुटुंबातील सदस्य सुरक्षित राहतात आणि घरात समृद्धी येते. मुख्य दारासमोर तुळस लावावी यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT