Living Room | Vastu Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Living Room: तुमच्या लिविंग रूम 'अशी' करा सजावट; नकारात्मकता होईल दूर

लिविंग रूम आकर्षक दिसाण्यासाठी वास्तुनुसार कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

वास्तुशास्त्रामध्ये घर बांधण्यापासून ते घरात कोणत्या वस्तू कशा आणि कुठे ठेवाव्यात यासंदर्भात अनेक नियम सांगितले आहेत. घरातील वास्तू बिघडली तर जीवनात समस्या निर्माण होऊ लागतात. त्याचबरोबर लिविंग रूम हे घराचे आकर्षणाचे केंद्र मानले जाते.

पाहुणे फक्त लिविंग रूममध्ये येतात. बहुतेक लोक लिविंग रूम सजवून ठेवतात. त्याचबरोबर जाणूनबुजून किंवा नकळत केलेल्या काही चुका लिविंग रूममध्ये नकारात्मकता निर्माण करू शकतात. म्हणूनच, ड्रॉइंग रूमशी संबंधित काही वास्तु नियम जाणून घेऊया, जे सुख आणि समृद्धी आकर्षित करतात.

योग्य दिशा

घराच्या उत्तर-पूर्व किंवा उत्तर-पश्चिम दिशेला लिविंग रूम असणे शुभ मानले जाते.

सोफ्याची योग्य दिशा

सोफा सारख्या जड वस्तु दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवाव्या. हलके फर्निचर उत्तर आणि पूर्व दिशेला ठेवावे. ईशान्य कोपरा शक्य तितका रिकामा किंवा खूप हलका असावा, म्हणजेच या दिशेला जास्त सामान ठेवू नये.

खिडकीची योग्य दिशा

लिविंग रूमल खिडकी पूर्व आणि उत्तर दिशेला असणे आवश्यक आहे.

भिंतींचा योग्य रंग

लिविंग रूममधील भिंतींवर लाइट रंग लावणे शुभ मानले जाते. तुम्ही लाइट गुलाबी, पिस्ता यासारखे रंग लावू शकता.

प्रवेशद्वार कोणत्या दिशेला असावे

लिविंग रूमचे प्रवेशद्वार उत्तर किंवा पूर्व दिशेला असणे खूप शुभ मानले जाते. यामुळे घरात नेहमी सकारात्मकता राहते.

नैसर्गिक सुर्यप्रकाश

लिविंग रूम अशा प्रकारे बनवावी की रूममध्ये नैसर्गिक सूर्यप्रकाश येत राहील. रूममध्ये जितका नैसर्गिक प्रकाश येईल तितका तो अधिक शुभ असेल.

खिडक्या कोणत्या दिशेला असाव्यात

लिविंग रूममधील खिडक्या उत्तर किंवा पूर्व दिशेला असणे खूप शुभ मानले जाते.

क्रिस्टल लोटस

लिविंग रूममध्ये टेबलावर क्रिस्टल कमळ ठेवणे शुभ असते. यामुळे नकारात्मकता कमी होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

SCROLL FOR NEXT