Broom Vastu Tips
Broom Vastu Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार केरसुणी वापराचे नियम

दैनिक गोमन्तक

अनेक लोक अथक परिश्रम करून देखील आर्थिक परिस्थिती बदलू शकत नाही.अनेकदा अनावश्यकपणे पैसे खर्च करण्यामागे वास्तुदोष देखील असतो. वास्तुदोषापासून (Vastushtra) मुक्ती मिळवण्यासाठी वास्तुशास्त्रात अनेक महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. घरात कोणती वस्तु कशी ठेवावी यांची अहिती दिली आहे.

आपल्या आजूबाजूच्या गोष्टींना आपल्या आयुष्यात खूप महत्त्व आहे. आपल्या आजूबाजूला असलेल्या वस्तू वास्तुशास्त्रानुसार (vastu shatra) सांभाळल्या पाहिजेत. अन्यथा त्याचा आपल्या आयुष्यावर वाईट परिणाम होतो. आपल्या घरात रोज वापरात येणारी अशीच एक वस्तु म्हणजे केरसुणी, ती कशी ठेवावी याबद्दल वास्तुशास्त्रात सांगितले आहे. (Broom Vastu Tips News)

ज्याप्रमाणे तुम्ही घरात (Home) पैसा लपवून ठेवता त्याचप्रमाणे वास्तुशास्त्रानुसार केरसुणीही लपवून ठेवली पाहिजे. घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये (Office) केरसुणी लावताच दारमागे ठेवावी. यामुळे घरातील आर्थिक समस्या कमी होऊन नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते. घरात झाडू कधीही उलटा ठेवू नका. त्यामुळे घरात कलह वाढतो. तसेच झाडू कधीही घराबाहेर किंवा छतावर ठेवू नये. असे केल्याने घरात चोरी होण्याची भीती असते. नवीन घर बांधल्यानंतर त्यामध्ये जुना झाडू घेऊन जाणे अशुभ मानले जाते.

वास्तुशास्त्रानुसार घरात किंवा ऑफिसमध्ये सारखी केरसुणी दिसणे चांगले मानले जात नाही. मोकळ्या जागेवर ठेवलेली केरसुणी चांगली ऊर्जा बाहेर टाकते. याशिवाय केरसुणी कधीच उभी ठेवू नये. केरसुणी उभी ठेवणे वास्तुशास्त्रात अशुभ मानले जाते. यामुळे घरात गरिबी येते. केरसुणी नेहमी जमिनीवर आडवी ठेवावी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

‘’प्रमोद सावंत सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री, त्यांच्या 1000 कोटींच्या घोटाळ्याची चौकशी करा’’; अलका लांबा यांचा हल्लाबोल

Ranbir Alia Video: रणबीरच्या मुंबई सिटीकडून गोव्याचा पराभव, आलियासोबत विजयी जल्लोषाचा व्हिडिओ व्हायरल

Smart City Panaji: स्मार्ट सिटी पणजीच्या खोदकामात आढळली रहस्यमय मूर्ती

Kala Academy: गोविंद गावडे कोणाला वाचवत आहेत? सल्लागाराकडे दाखवले बोट

Economic Crisis: पाकिस्तानचा कैवारी बनणाऱ्या देशाला वाढत्या महागाईनं ग्रासलं; दोन वेळच्या अन्नासाठी जनता करतेय संघर्ष!

SCROLL FOR NEXT