Vastu Tips|parijat plant Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips: 'पारिजात' या दिशेला लावल्यास, तुमच्यासारखे नशीबवान कोणीच नाही

वास्तूशास्त्रामध्ये झाडे आणि घरातील वस्तू योग्य दिशेने आणि योग्य वेळी ठेवण्यासाठी अनेक नियम सांगण्यात आले आहेत.

दैनिक गोमन्तक

वास्तुशास्त्रामध्ये घराच्या सुख-समृद्धीसाठी अनेक उपाय सांगितले आहेत.हे उपाय अगदी सोपे आहेत. असे मानले जाते की जर हे उपाय योग्य पद्धतीने केले गेले तर ते कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकतात. असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीने वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरात सर्व काही ठेवले तर घरात सुख-शांती राहते.

वास्तुशास्त्रानुसार (Vastu Tips) वस्तू ठेवल्याने जीवनात अडचणी येत नाहीत. त्याचप्रमाणे वास्तुशास्त्रात काही झाडे अतिशय शुभ मानली जातात. असे मानले जाते की अशी काही झाडे आहेत जी शास्त्रात दिलेल्या नियमानुसार घरात लावल्यास देवी लक्ष्मी घरात वास करते.

देवी लक्ष्मीचे आवडते फुल

पारिजातकाचे फूल माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे असे शास्त्रात सांगितले आहे . पारिजात वनस्पतीची फुले खूप सुवासिक असतात. ही फुले रात्रीच उमलतात आणि घरात लावल्याने शांती राहते असा समज आहे.

तणाव दुर

पारिजात फुलांचा वास इतका सुवासिक असतो की त्यामुळे तणाव आणि निद्रानाश यासारख्या गोष्टी दूर होतात . या फुलांच्या सुगंधाने मानसिक समस्या दूर होतात. त्याच्या सुगंधाने मनाला शांतीही मिळते.

आरोग्यादायी

घरामध्ये पारिजात रोप लावल्याने घरातील सदस्यांना आरोग्य लाभ देते तसेच दीर्घायुष्याचे वरदानही मिळते. आयुर्वेदात धार्मिक महत्त्वाबरोबरच पारिजातची वनस्पती आणि फुलेही वापरली जातात. आयुर्वेदात पारिजातच्या फुलांपासून अनेक प्रकारच्या रोगांपासून बचाव करणारी औषधे बनवली जातात

या दिशेला लावावे रोप

घरामध्ये पारिजात रोप लावण्यासाठी वास्तुशास्त्रात दिशा सांगितली आहे. वास्तूमध्ये सांगितले आहे की घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढवण्यासाठी पारिजात वनस्पती घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला लावाणे शुभ मानले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Atal Patrol Ship: खोल समुद्रात स्वदेशी 'अटल' घालणार गस्त! गोवा शिपयार्डतर्फे 6वे द्रुतगती जहाज; आणखी 12 जहाजांचे जलावतरण होणार

Goa Job Scam: 20 लाख घेतात, अमेरिकेत नोकरीचे आश्वासन देतात; गोव्यातील तरुणांची होतेय फसवणूक, आमोणकरांनी मांडली व्यथा

Goa University: ‘चोरीचा अहवाल फुटला कसा?’ विद्यापीठ शिक्षक संघटनेच्या बैठकीत 4 तास खल

Goa Politics: खरी कुजबुज; युरीबाबको गुस्सा क्यों आता है?

Goa: गोव्‍यात काम देण्‍याच्‍या बहाण्‍याने युवतींची फसवणूक! महाराष्‍ट्रातील मुलीही विळख्‍यात; नेपाळ, केनिया, युगांडाच्‍या तरुणींना आमिष

SCROLL FOR NEXT