Vastu Tips For Plant Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vastu Tips For Plant: केवळ तुळसच नाही, तर ही वनस्पती करते मालामाल

Vastu Tips: वास्तुशास्त्रात प्रत्येक वनस्पतीचे वेगळे महत्त्व सांगितले आहेत.

दैनिक गोमन्तक

वास्तुशास्त्रात (Vastu Tips) प्रत्येक वनस्पतीचे वेगळे महत्त्व आहे. ते घरात किंवा घराबाहेर लावण्याचा उद्देशही वेगळा असतो. वास्तू तज्ञ म्हणतात की झाडे आणि रोपे योग्य दिशेने किंवा योग्य ठिकाणी लावली तरच ते सकारात्मक परिणाम देतात. अन्यथा नकारात्मक परिणामांना सामोरे जावे लागते. लक्ष्मीच्या आशीर्वादासाठी घरामध्ये तुळशीचे रोप लावले जाते. जेणेकरून माता लक्ष्मी सदैव घरात आणि कुटुंबात वास करते. त्याचप्रमाणे घरामध्ये बिल्वचे झाड लावणे योग्य आहे. 

बेलाचे झाड नाव ऐकताच मनात भगवान शंकराचे नाव घुमू लागते. शतकानुशतके शिवलिंगावर बेलाचे पान अर्पण केली जात आहेत. आणि असेही ऐकले आहे की शिवाला बेलपत्र खूप प्रिय आहे. पण तुम्हाला माहित आहे का की त्यामध्ये मां लक्ष्मी वास करते. त्यामुळे त्याची पूजा केल्याने भगवान शिव तसेच देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. चला जाणून घेऊया बेलाच्या झाडाचे फायदे कोणचे आहेत.

  • घरामध्ये बेलाचे झाड लावणेयाचे फायदे

  • ज्योतिष शास्त्रात असे सांगितले आहे की घरात बेलाचे झाड लावल्याने व्यक्तीला कोणत्याही प्रकारच्या आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत नाही. असे म्हणतात की, बेलाचे वृक्षाखाली उभे राहून अन्न, खीर, मिठाई इत्यादी दान केल्याने माणसाच्या घरी कधीही गरिबी येत नाही. 

  • घरामध्ये बेलाचे झाड लावल्यास घरात साप येत नाहीत, असेही म्हटले जाते. बेलाचे वृक्ष भगवान शिवाशी संबंधित आहे. 

  • वास्तूनुसार बिल्वचे झाड लावल्याने भगवान शिवाचा आशीर्वाद मिळतो. असे केल्याने सर्व रखडलेली कामे पूर्ण होतात. 

  • बिल्वाच्या झाडाच्या मुळाला लाल कपड्यात बांधून घराच्या तिजोरीत ठेवल्यास व्यक्तीला पैशाची कमतरता भासत नाही. 

  • असे मानले जाते की बेलाचे झाड लावल्याने संततीची वृद्धी होते. त्याचबरोबर हे झाड तोडल्याने संततीची वाढ खुंटते. 

  • असे मानले जाते की या झाडाला स्वच्छ पाण्याने सिंचन केले तर पितर तृप्त होतात आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो.

  • वास्तु तज्ज्ञांच्या मते, बेलाचे झाड आणि पांढरा आक जोडीने लावल्याने भगवान शिव आणि माता लक्ष्मी या दोघांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

SCROLL FOR NEXT