Utensil Cleaning Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Utensil Cleaning Tips: 'या' 5 गोष्टींचा वापर भांड्यावर आणेल चमक

भांडी धुताना साबण संपला तर टेन्शन घेऊ नका. या काही गोष्टींचा वापर करून तुम्ही भांडी चमकवू शकता.

Puja Bonkile

Utensil Cleaning Tips: आजकाल भांडी धुण्यासाठी साबणाचा वापर केला जातो. पण अनेक वेळा असे होते की जेव्हा आपण भांडी धुण्यास सुरुवात करतो तेव्हा साबण संपतो. अशावेळी काय करावे सुचत नसेल तर हा बातमी तुमच्यासाठीच आहे.

जर तुमच्यावरही अशी परिस्थिती उद्भवली तर अजिबात घाबरू नका. आज आम्ही तुम्हाला असे 5 घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही साबण न वापरता तुमची घाण भांडी चमकवू शकता.

  • व्हिनेगर

कोणत्याही प्रकारची भांडी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही व्हिनेगरचा वापर करू शकता. यासाठी एका बाटलीत 5 चमचे व्हिनेगर आणि एक कप पाणी घालून मिश्रण तयार करावे. त्यानंतर ते मिश्रण घाणेरड्या भांड्यांवर टाकावे.  काही वेळाने ते भांडे कोमट पाण्याने धुवावे. यामुळे भांडी चमकतील.

  • राखेने साफ करता येते

जर भांडे घासतांना साबण संपले असेल तर तुम्ही राख वापरू शकता. पुर्वी अनेक लोक राख वापरून भांडी स्वच्छ करत होते. अजूनही अनेक ठिकाणी राख वापरली जाते. यासाठी भांडे थोडे ओले करून त्यात राख शिंपडा. यानंतर, स्पंजच्या मदतीने, भांडी घासून स्वच्छ करा. 

  • बेकिंग सोडा

अनेक वेळा कढई, तवा, फ्रायपॅन, कुकर किंवा भांडे यासारख्या भांड्यांवर तेलाचे डाग दिसतात, जे साबणाने धुतल्यानंतरही सहज स्वच्छ होत नाहीत. अशावेळी ते डाग काढण्यासाठी तुम्ही बेकिंग सोडा वापरू शकता. ते वापरण्यासाठी भांडी गरम पाण्यात भिजवा आणि नंतर त्यात थोडा बेकिंग सोडा शिंपडा आणि स्पंजच्या मदतीने स्वच्छ करा. 

  • तांदळाचे पाणी

भांडी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही उकडलेले तांदळाचे पाणी देखील वापरू शकता. त्यात सायट्रिक ऍसिड आणि स्टार्च असते. ज्यामुळे भांड्यांमध्ये साचलेली ग्रीस सहज निघून जाते. त्याचा योग्य वापर करण्यासाठी भांडी तांदळाच्या पाण्यात अर्धा तास भिजत ठेवा. नंतर ती भांडी चांगली घासून घ्या. यानंतर त्यांना कोमट पाण्याने धुवा. 

  • नॅचरल क्लिनर

भांडी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही घरी नैसर्गिक भांडी क्लिनर देखील बनवू शकता. यासाठी एक कप गरम पाण्यात 1 लिंबाचा रस विरघळवून घ्या आणि नंतर त्यात 2 चमचे मीठ घाला. यानंतर, दोन्ही चांगले मिसळा. हे द्रावण कोणत्याही घाणेरड्या भांड्यावर मिसळून स्पंज करा. तुमच्या भांड्यावर साचलेली घाण लगेच साफ होईल आणि भांड्याला चांगला वास येईल. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Apostille Process: परदेशात जाणाऱ्या गोवेकरांसाठी खूशखबर! कागदपत्रांच्या पडताळणीची प्रक्रिया झाली सुलभ; सरकारकडून 'SOP' जाहीर

Babush Monserrate Santa Cruz Office: "परवानगी मागितली असती तर नकारच दिला असता!", बाबूश मोन्सेरात यांच्या कार्यालयावरुन भाजप प्रदेशाध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं

Konkan to Akkalkot ST Bus: कोकणवासीयांसाठी स्वामींचं दर्शन झालं सोपं! सिंधुदुर्गातून अक्कलकोटसाठी रोज धावणार 'लालपरी'; मार्ग, वेळ जाणून घ्या

VIDEO: वंदे भारतमध्ये धक्कादायक प्रकार! रेल्वे अधिकाऱ्याच्या पत्नीने ड्रायव्हर केबिनमध्ये बनवली रील; व्हिडिओ Viral होताच कारवाईचे आदेश

Jharkhand Mob Lynching: अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या आरोपातून 150 जणांच्या जमावाकडून तरुणाची हत्या; आई-वडिलांना बांधून मुलावर काठ्या-दगडांनी हल्ला

SCROLL FOR NEXT