Turichya Danyacha Bhat:  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Winter special Recipe: ओल्या तुरीच्या दाण्याचा मसाले भात हिवाळ्याची मज्जा करतो द्विगुणित, नोट करा रेसिपी

हिवाळ्यात तुरीच्या शेंगा मोठ्या प्रमाणात येतात. यापासून वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवले जातात.

Puja Bonkile

Turichya Danyacha Bhat: हिवाळ्यात तुरीच्या शेंगा मोठ्या प्रमाणात येतात. यापासून वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवले जातात. मग यामध्ये तुरीच्या दाण्याचा मसाले भात,आमटी, कचोरी ,उसळ किंवा फक्त गरम पाण्यात उकळून देखील शेंगांचा आस्वाद घेतला जातो. ओल्या तुरीच्या दाण्यापासून मसाले भात कसा बनवायचा हे जाणून घेऊया. हा मसाले भात बनवायला सोपा आणि चवदार देखील आहे.

तुरीच्या दाण्याचा मसाले भात बनवण्यासाठी लागणारे साहित्य

ओले तुरीचे दाणे

जिरं

मोहरी

तिखट

हळद

काळा मसाला

तेज पान

कांदा

बटाटे

फुलकोबी

तांदुळ

तेल

मीठ

टिप: तुम्ही टोमॅटो देखील टाकू शकता.

तुरीच्या दाण्याचा मसाले भात बनवण्याची कृती

ओल्या तुरीच्या दाण्यापासून मसाले भात तयार करण्यासाठी सर्वात पहिले दाणे काढून घ्यावे. नंतर एका कुकरमध्ये तेल टाकून त्यात जिरं, मोहरी, कांदा, तेजपान, फुलकोबी, बटाटा,तुरीचे दाणे टाकून चांगले मिक्स करावे. नंतर लाल तिखट, हळद, काळा मसाला टाकून चांगले मिक्स करावे. नंंतर तांदूळ स्वच्छ धुवून त्यात टाकावे आणि चांगले मिक्स करावे. शेवटी गरजेनुसार पाणी आणि मीठ टाकून कुकरचे झाकण लावावे. तीन शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करावा. तुरीच्या दाण्याचा गरमा-गरम मसाले भात तयार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT