Tulsi Vivah 2023 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Tulsi Vivah 2023: तांदळाचे 'हे' उपाय केल्यास मिळेल सर्व कामात यश

आज तांदळाचे पुढील उपाय केल्यास तुम्हाला अनेक कामांमध्ये यश मिळेल.

Puja Bonkile

Tulsi Vivah 2023: कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला देवूठाणी एकादशी म्हणतात. या एकादशीनंतर देव दिवाळी साजरी केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, असे म्हटले जाते की भगवान विष्णू 4 महिन्यांच्या योगनिद्रानंतर जागे होतात.

या एकादशीनंतर सर्व शुभ कार्ये सुरू होतात. या एकादशीच्या एका दिवसानंतर तुळशीचे लग्न केले जाते. यंदा तुळशीचे लग्न 24 नोव्हेंबर म्हणजे आज केले जात आहे. आज तांदळाचे काही खास उपाय केल्यास माणसाला सर्व कामात यश मिळू शकते.

  • तांदूळ दाण करावे

तुळशीच्या लग्नाच्या वेळी तांदूळ दान करणे खूप शुभ मानले जाते. यामुळे व्यक्तीला कधीही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही. एवढेच नाही तर चंद्र ग्रह या दिवशी तांदूळ दान केल्याने शुभ फळ प्रदान करतो. 

  • प्रदक्षिणा गालताना तांदूळ हातात घ्यावे

तुळशी लग्नाच्या वेळी प्रदिक्षणा करत असाल तर हातात तांदूळ घेऊनच करावे. असे केल्याने शाश्वत फळांसह मोक्ष प्राप्त होतो. 

  • तांदुळ अर्पण करावे

तुळशीला शालिग्राम आणि अक्षत अर्पण करून प्रार्थना करावी. असे केल्याने तुमचे वैवाहिक जीवन लवकर सुधारेल आणि तुम्हाला शुभ परिणाम मिळू शकतात. 

  • तांदळाच्या पिठाची रांगोळी काढावी

तुळशीच्या लग्नात रांगोळी काढत असाल तर तांदळाच्या पिठानेच रांगोळी काढावी. यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो  आणि भगवान विष्णूही प्रसन्न होतात.

  • विष्णूला खार अर्पण करावी

भगवान विष्णूला तांदळाची खार अर्पण करावी. असे केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात. तुमच्या आयुष्यात आर्थिक समस्या दूर होतात.

  • तांदूळ नदीत सोडावे

ब्रह्म मुहूर्तावर उठून पवित्र नदीत मूठभर तांदूळ प्रवाहित करावे. असे केल्याने रोग आणि दोषांपासून मुक्ती मिळते आणि व्यक्तीच्या आयुष्यात आनंद येतो. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sport: 'स्पोर्टिंग'च्या नवोदितांकडे सर्वांच्या नजरा! चॅरिटी कपमधून गोवा फुटबॉल असोसिएशनच्या नव्या मोसमाला सुरुवात; धेंपोविरुद्ध रंगणार थरारक लढत

Goa Women Cricket: पूजा, अथश्री, निखिलाची लक्षवेधी कामगिरी! गोव्याच्या मुलींनी हिमाचल प्रदेशला 18 धावांनी नमवले; स्पर्धेतील दुसरा विजय

Allahabad High Court: 'कोठडीत आरोपीला मारहाण करणं पोलिसांची ऑफिशियल ड्युटी नाही'! हायकोर्टानं यूपी पोलिसांना फटकारलं; काय नेमकं प्रकरण?

Goa ST Reservation: जनगणनेनंतरच गोव्यात 'एसटी' आरक्षण शक्य! मायकल लोबोंचा दावा; अद्ययावत आकडेवारीशिवाय आरक्षणाला न्यायालयीन आव्हानाची शक्यता

Bardez Development: बार्देशच्या कायापालटाचा निर्धार! मायकल लोबोंकडून प्रलंबित विकासकामांना गती; रस्ते, पूल, आरोग्य केंद्रांवर विशेष भर

SCROLL FOR NEXT