Benefit of Basil Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Benefit of Basil: तुळशीचा नियमित वापर केल्यास मिळतील 'हे' आरोग्यदायी फायदे

शारीरिक व्याधींसोबत केस आणि त्वचेशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी तुळस खूप उपयुक्त आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

हिंदूधर्मात अंगणातील तुळशीला देवता स्वरूप मानले जाते. कारण तुळशीच्या वापराने ब-याच आजारांपासून आपल्याला सुटका मिळते. वातावरणात ऑक्सीजनचा मुबलक पुरवठा हा याच तुळशीपासून मिळतो. त्यामुळेच आयुर्वेदात तुळशीला खूप महत्व प्राप्त झाले आहे. तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात, जे शरीराला अनेक आजारांपासून वाचवण्यास मदत करतात. तुळशीमध्ये झिंक, लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी, ए असते. इत्यादी आढळतात. हे अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-बायोटिक गुणधर्मांनी समृद्ध आहे. शारीरिक व्याधींसोबत केस आणि त्वचेशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी तुळस खूप उपयुक्त आहे.

• मुरूमांवर गुणकारी- तरुण वयातील मुला-मुलींपासून मध्यमवयीन स्त्रीयांपर्यंत अनेकांना मुरूमांचा त्रास असतो. मुरूम किंवा पुरळांपासून मुक्तता हवी असल्यास तुळशीपासून बनवलेल्या लेपाइतकं श्रेष्ठ गुणकारी असं काहीच नाही. हा लेप तयार करण्यासाठी तुळशीची काही पाने, संत्र्याची साल घेऊन त्यात गुलाबजल मिसळा आणि त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट १५ मिनिटे चेह-यावर लावून ठेवा आणि नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. यामुळे तुमच्या चेह-यावरील मुरूम जाऊन चेहरा उजळण्यास सुरूवात होईल

• सर्दी-खोकला - तुळशीच्या पानांमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी व्हायरल गुणधर्म असतात. जे कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून संरक्षण करण्यास मदत करू शकतात. जर तुम्हाला सर्दी-खोकल्याची समस्या असेल तर तुम्ही तुळशीचा चहा पिऊ शकता. हे करण्यासाठी, 8-10 तुळशीची पाने पाण्यात टाका, आता ते उकळवा. नंतर ते गाळून कोमट करा. तुम्ही याचे नियमित सेवन करू शकता. खोकल्यामध्ये हे गुणकारी सिद्ध होऊ शकते.

• कॅन्सरवर लाभदायी - कॅन्सर सर्वात भयंकर आजार असला तरी आयुर्वेदामध्ये त्यासाठीही इलाज आहे. तुळशीमध्ये युजेनाल कंम्पाऊंड हा घटक असल्याने तो कॅन्सरवर मात करण्यास मदत करतो. ब-याच अभ्यासांमध्येही सांगितले गेले आहे की, तुळस कॅन्सरवर प्रभावशाली आहे. त्यामुळे रोज तुळशीची पाने चघळणा-या व्यक्तींना कॅन्सर होण्याची संभावना फार कमी असते. दहा ग्रॅम तुळशीच्या पानांचा रस 20 ते 30 ग्रॅम ताजे दही किंवा 2 ते 3 चमचे मधाबरोबर नियमित घेतल्यास हे कॅन्सरवर गुणकारी औषध ठरते.

• श्वासाची दुर्गंधी- श्वासाची दुर्गंधी येत असेल तर त्यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही तुळशीच्या पानांचे सेवन करू शकता. श्वासाची दुर्गंधी दूर होण्यास मदत होते. यासाठी तुम्ही रोज 4-5 तुळशीची पाने चावून खाऊ शकता.

• मेमरी बूस्टर- तुळशीमध्ये अँटी-डिप्रेसंट गुणधर्म असतात, जे मेंदूसाठी फायदेशीर असतात. याच्या नियमित सेवनाने स्मरणशक्ती मजबूत होते. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही दररोज रिकाम्या पोटी तुळशीची ५-६ पाने चावून खाऊ शकता किंवा त्याचा चहाही पिऊ शकता.

(आयुर्वेदिक चिकित्सा ही व्यक्तिपरत्वे होणारी असते. वरील माहितीमधील औषधे तज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावीत)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT