Tongue Cleaning Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Tongue Cleaning Tips : दातांसोबतच जिभेची स्वच्छताही महत्वाची; वापरा हे उपाय

दात स्वच्छ ठेवणे जेवढे आवश्यक आहे, तेवढेच गरजेचे आहे जिभेची स्वच्छता.

दैनिक गोमन्तक

जेव्हा जेव्हा तोंड स्वच्छ करण्याचा प्रश्न येतो तेव्हा बहुतेकांना असे वाटते की चेहरा स्वच्छ ठेवणे आणि दात चमकणे पुरेसे आहे. पण ते तसे नाही. दात स्वच्छ ठेवणे जेवढे आवश्यक आहे, तेवढेच गरजेचे आहे जिभेची स्वच्छता. जीभ स्वच्छ न केल्यामुळे तोंडातून दुर्गंधी तर येतेच, शिवाय अनेक आजारांचे कारणही बनू शकते. वास्तविक, जेव्हा आपण जीभ व्यवस्थित स्वच्छ करत नाही तेव्हा अनेक प्रकारचे जीवाणू आपल्या पोटात जातात ज्यामुळे आपण आजारी पडतो. तुम्ही तुमची जीभ कशी स्वच्छ करू शकता आणि दिवसातून किती वेळा ती स्वच्छ करावी. (Tongue Cleaning Tips)

  • ब्रश

तुम्ही बघितलेच असेल की आता बाजारात असे अनेक टूथब्रश येत आहेत, ज्यांच्या मागच्या बाजूला जीभ स्वच्छ करण्यासाठी टंग क्लीनर असतो. जीभ स्वच्छ करण्यासाठी, ब्रश जीभेच्या मागील बाजूस समोर आणा. असे सलग तीन ते चार वेळा केल्यानंतर स्वच्छ पाण्याने तोंड धुवा.

  • जीभ स्क्रॅपर

जीभ स्वच्छ करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे. जीभ स्क्रॅपर जीभेच्या मागील बाजूस ठेवा आणि हळू हळू पुढे खेचा. स्क्रॅपरची रुंदी जास्त असल्यामुळे ती संपूर्ण जीभ साफ करते.

  • मीठ

जर तुम्हाला तुमची जीभ नैसर्गिक पद्धतीने स्वच्छ करायची असेल तर तुम्ही मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवा किंवा जिभेवर थोडे मीठ टाकून स्क्रब करू शकता.

  • हळद

तुम्ही तुमची जीभ हळदीनेही स्वच्छ करू शकता. हळद पावडर ब्रशवर शिंपडा आणि हलक्या हातांनी घासून घ्या. यानंतर, कोमट पाण्याने तोंड पूर्णपणे स्वच्छ करा.

  • स्वच्छ केल्यानंतर हे करा

स्क्रब, हळद, टूथब्रश इत्यादींनी जीभ स्वच्छ केल्यानंतर एकदा आरशात पहा. जर जीभ गुलाबी किंवा ताजी दिसत असेल तर याचा अर्थ ती व्यवस्थित साफ केली गेली आहे. परंतु, जर जिभेवर पिवळसरपणा किंवा पांढरा रंग दिसत असेल तर ती पुन्हा स्वच्छ करणे आवश्यक आहे.

  • तुम्ही दिवसातून किती वेळा जीभ स्वच्छ करता?

जर तुम्हाला बॅक्टेरिया आणि प्लाक दूर ठेवायचे असतील तर दिवसातून किमान 2 वेळा नक्कीच जीभ स्वच्छ करा. दात घासल्यानंतर जीभ स्वच्छ करणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. झोपण्यापूर्वी जीभ स्वच्छ केल्याने बॅक्टेरिया वाढण्याची क्षमता जवळजवळ नगण्य होते आणि तुम्ही निरोगी राहता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT