Tips to Buying Sweets in Diwali  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Sweets in Diwali : दिवाळीत बाजारातून मिठाई घेणार असाल तर सावधान! भेसळयुक्त मिठाईपासून राहा दूर

जेव्हाही तुम्ही बाजारात मिठाई खरेदी करण्यासाठी जाल तेव्हा या गोष्टी लक्षात ठेवा, जेणेकरून तुमची दिवाळी आनंदी आणि सुरक्षित दिवाळी होईल.

दैनिक गोमन्तक

दिव्यांचा आणि आनंदाचा सण दिवाळी यंदा 24 ऑक्टोबर रोजी साजरा होणार आहे. वर्षभरातील हा सर्वात खास सण आहे. फटाके, मिठाई, दिवे हे या सणाचे प्रतीक मानले जातात. बाजारात मिठाईचा ढीग आहे. यावेळी रंगीबेरंगी आणि स्वादिष्ट मिठाईची दुकाने सजलेली असतात. पण यादरम्यान भेसळही मोठ्या प्रमाणात सुरू असते. अशा वेळी तुमची एक चूक सणाच्या आनंदात अडचणी आणू शकते. त्यामुळे जेव्हाही तुम्ही बाजारात मिठाई खरेदी करण्यासाठी जाल तेव्हा काही गोष्टी लक्षात ठेवा, जेणेकरून तुमची दिवाळी आनंदी आणि सुरक्षित दिवाळी होईल.

(Tips to Buying Sweets in Diwali )

बनावट मिठाईपासून दूर रहा

बाजारातून मिठाई घेणार असाल तर अनेक रंगीबेरंगी मिठाई पाहायला मिळतील. या सुंदर दिसणार्‍या मिठाईपासून दूर रहा.

कारण या मिठाईमुळे अॅलर्जी, किडनीचे आजार आणि श्वसनाचे आजार यांसारखे आजार होऊ शकतात आणि सणासुदीची मजा लुटता येते. त्यामुळे रंगीबेरंगी मिठाई खरेदी करणे आणि खाणे टाळावे हे लक्षात ठेवा.

बाजारात अनेक मिठाईंवर चांदीचा थर दिसून येते. ते अतिशय तेजस्वी आणि आकर्षक दिसते. कारण आजकाल भेसळ करणारे मिठाई सुंदर बनवण्यासाठी चांदीऐवजी अॅल्युमिनियमचा वापर करतात, जे आरोग्यासाठी घातक आहे. त्यामुळे अशा मिठाई टाळल्या पाहिजेत.

Tips to Buying Sweets in Diwali

भेसळयुक्त दूध टाळा

सणासुदीच्या काळात मिठाईमध्ये भेसळयुक्त मावा बिनदिक्कतपणे वापरला जातो. जो आपल्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतो. अशा परिस्थितीत दिवाळीची मिठाई खरेदी करताना विश्वासू किंवा चांगल्या दुकानातूनच खरेदी करावी. माव्यात दुधाच्या पावडरची भेसळ करणे आरोग्यास हानिकारक आहे. माव्यातील भेसळ समजत नसेल तर त्यावर आयोडीनचे दोन ते तीन थेंब टाकून पहा. माव्याचा रंग निळा झाला तर समजून घ्या की त्यात भेसळ झाली आहे. त्यामुळे दिवाळीत घरीच मिठाई बनवण्याचा प्रयत्न करा. बाजारातून मिठाई घेणार असाल तर भेसळयुक्त मिठाईपासून दूर राहा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Telangana Accident: किंकाळ्या अन् आक्रोश! अनियंत्रित बसची कंटेनरला जोरदार धडक, 6 ठार, 20 जखमी; तेलंगणात भीषण अपघात

Goa Drug Racket: आशा, रोविनानंतर आता पोक्सो कैदी योगेश मांद्रेकरही अटकेत; कोलवाळ जेल ड्रग्स प्रकरणात तिसरी कारवाई

Goa Municipal Elections: विधानसभेपूर्वीच पालिका निवडणुका! 11 नगरपालिकांसाठी कोर्टाचा मोठा आदेश, 4 जानेवारीपर्यंत निकाल

Operation Sindoor: ''शेवटचा वार भारताचाच असणार होता''!, 'ऑपरेशन सिंदूर'बाबत माजी CDS अनिल चौहान यांचा धक्कादायक खुलासा; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानची दैना VIDEO

Horoscope 26 August 2026: बुधवार 'या' राशींसाठी ठरणार वरदान! करिअरमध्ये मिळणार गरुडभरारीची संधी; उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होणार

SCROLL FOR NEXT