लाइफस्टाइल

Rudraksh Tips: रुद्राक्ष परिधान करताना 'या' चुका करू नका

गोमन्तक डिजिटल टीम

हिंदू धर्मात रुद्राक्षाचे (Rudraksh) विशेष महत्त्व आहे. रुद्राक्षाचा संबंध भगवान शिवशंकराशी (Lord Shiva) येतो. भगवान शंकराच्या अश्रूंपासून रुद्राक्षाची निर्मिती होते असे मानले जाते. रुद्राक्षाचे 21 हून अधिक प्रकार आहेत आणि प्रत्येकाचे वेगळे महत्त्व आहे. रुद्राक्ष उर्जेने भरलेला एक शक्तिशाली अलंकार आहे, दुर्बल हृदयाच्या लोकांनी तो परिधान करू नये. रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी तज्ञ ज्योतिषाचा सल्ला जरूर घ्यावा.

राशीनुसार रुद्राक्ष परिधान केल्याने त्याचा उत्तम प्रभाव होतो. रुद्राक्ष धारण केल्याने सकारात्मकता वाढते आणि राग कमी होतो. रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी आणि नंतर काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे, अन्यथा लाभाऐवजी नुकसान सहन होऊ शकते.

रुद्राक्ष परिधान करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा (Rudraksha Wearing Rules)

-रुद्राक्ष स्वतःच्या पैशाने खरेदी करून धारण करावा.

-रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी एखाद्या अनुभवी ज्योतिषाकडून सक्रिय करून घ्या.

-जर रुद्राक्ष क्रियाशील नसेल तर तो धारण करून उपयोग नाही.

-शुभ दिवशी पूजा केल्यानंतरच रुद्राक्ष धारण करावा.

या गोष्टी लक्षात ठेवा (Things to know about Rudraksh)

-अंत्यसंस्कार तसेच इतर संवेदनशील कार्यक्रमांत रूद्राक्ष परिधान करणे टाळा.

-रुद्राक्षाला खराब हातांनी स्पर्श करू नये.

-झोपताना रुद्राक्ष काढावा.

-रुद्राक्ष धारण केल्यानंतर नॉनव्हेज खाणे टाळावे.

-भगवान शंकराची नियमित पूजा करायला विसरू नका.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT