Year End Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Year Ender: यंदा गूगलवर जास्त सर्च झाली ‘या’ आजारांची माहिती !

कोविड 19शी संबंधित आजार आणि घरगुती उपाय याबद्दलही बरीच माहिती सर्च करण्यात आली.

गोमन्तक डिजिटल टीम

मोबाईल आणि इंटरनेट (internet) हे आजकाल लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहेत. आयुष्यातल्या प्रत्येक छोट्या-मोठ्या समस्येचे, कोणत्याही प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी गूगलवर (google) टायपिंग सुरू होते. जगातलं सर्वात मोठं सर्च इंजिन असणाऱ्या गूगलला माहीत नाही अशी एकही गोष्ट नाही. म्हणूनच कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमध्ये जेव्हा लोकं घरात होती, तेव्हा गूगलवर (google search) हजारो प्रश्न विचारण्यात आले होते.

कदाचित तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल, पण कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रश्न विचारून लोकांनी गूगलला अक्षरश: भंडावून सोडलं. त्याशिवाय कोविड 19शी संबंधित आजार आणि घरगुती उपाय याबद्दलही बरीच माहिती सर्च करण्यात आली.

  • ऑक्सिजन वाढवण्याचा उपाय :-

कोरोना काळात अनेक लोक ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यूमुखी पडत होते. त्यावेळी लोकांनी गूगल सर्च इंजिनवर ऑक्सिजन वाढवण्याच्या सर्व टिप्स अथवा उपाय शोधले होते.

  • तापावर उपाय :-

कोरोनाच्या काळात लोकांनी तापासंदर्भातही बराच शोध घेतला. ताप दूर करण्यासाठी अनेक प्रकारचे घरगुती उपाय यावेळी गूगलवर शोधण्यात आले.

  • प्रतिकारशक्ती वाढवणे :-

कोरोनाच्या काळात बहुतांश लोकांचा भर हा रोगप्रतिकारशक्तीव वाढवण्यावर होता. त्यामुळे कोरोना काळात लोकांनी इम्युनिटी बूस्टिंग म्हणजेच रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी कोणते उपाय करावेत, काढा प्यावा यासंदर्भात माहिती सर्च केली.

  • घसा खवखवणे :-

घशात कोणत्याही प्रकारची खवखव होणे, हे कोरोनाचे लक्षण असल्याचे अनेक डॉक्टरांनी सांगितले होते. कोविडच्या काळात लोक घसा खवखवणे, खोकला यासारख्या समस्यांशी लढत होते, त्यामुळे ते टाळण्यासाठी घरगुती उपायांबद्दल अधिक माहिती शोधण्यात आली.

  • दूध आणि हळद :-

दूध पिण्याचे अनेक फायदे आहेत, हे सर्वांनाचा माहीत आहे. तर हळद ही रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि सर्दी खोकला आणि छातीतील कफ यापासून मुक्त होण्यासाठी खूप प्रभावी ठरते. त्यामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT