Eyes  Dainik Gomanatk
लाइफस्टाइल

'हे' पाच पदार्थ वाढवतील डोळ्यांची दृष्टी

Dainik Gomantak

फोन किंवा लॅपटॉपवर जास्त वेळ काम करण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच लहान मुले देखील सतत लॅपटॉप, मोबाइलवर किंवा टीव्हीसमोर बसून असतात. याचा डोळ्यांवर वाईट परिणाम होऊन लहान वयातच अनेकांना डोळ्यांचा त्रास होतो. डोळ्यात पानी येणे , अस्पष्ट दृष्टी आणि वारंवार डोके दुखणे अशी त्याची लक्षणे आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या दृष्टीदानावारील अहवालानुसार, जगभरातील एक अब्जाहुन अधिक लोक दृष्टीदोषाने जीवन जगात आहेत. कारण या लोकांना मोतीबिंदू , ग्लूकोमा हे आजार डोळ्यांची काळजी न घेतल्याने होतात. बदलत्या जीवन शैलीत डोळ्याकडे दुर्लक्ष करणे हे घटक ठरू शकते. परंतु घरगुती उपायांच्या मदतीने देखील डोळ्यांचे आरोग्य नीट ठेवता येते. त्याचप्रमाणे डोळ्यासाठी सकस आहार घेणे महत्वाचे आहे. जाणून घेऊया व्हिटॅमिनयुक्त पदार्थ

डोळ्यांची समस्या दर्शविणारे लक्षणे -

1) दृष्टी अस्पष्ट होणे

2) डोळ्यांमध्ये सुज येणे तसेच वेदना होणे

3) डोळे लाल होऊन सूज येणे

या समस्यांचे मुख्य कारण -

1) हवेतील प्रदूषणाची पातळी वाढल्याने डोळ्यांमध्ये धूळ साचते.

2) डोळ्यांवर किंवा आजूबाजूला अनेक कॉस्मेटिक उत्पादने वापल्याने डोळ्यांना धोका निर्माण होऊ शकतो.

3) तंत्रज्ञाचा सतत वापर केल्याने डोळे कोरडे पडून सारखे डोळ्यात पानी येते.

- नैसर्गिकरित्या आहारचा या पदार्थांचा समावेश केल्याने दृष्टी चांगली राहण्यास मदत होते. व्हिटॅमिन सी आणि अॅंटीऑक्सिडेंट ने समृद्ध असलेल्या आवळ्याचे सेवन केल्याने

- डोळ्यांची समस्या दूर होऊ शकते . व्हिटॅमिन सी निरोगी पेक्षिणा उत्तेजन देण्यास आणि रेटिना पेशींना योग्य कार्य चालू ठेवण्यास मदत करते. त्यामुळे दृष्टी चांगली होते.

- डोळ्यांच्या आरोग्यासाठी मासे , विशेषत: तांबूस पिवळट रंगाचा एक चांगला पर्याय असू शकतो. ओमेगा - 3 फॅटी असिड से भरपूर , डोळे कोरडे न पडण्यास मदत होते.

- अंड्यातील पिवळ्या बलकमध्ये व्हिटॅमिन ए , ल्यूटिन, जेक्सैन्थिन आणि जिंक डोळ्यांच्या आरोग्यासाठी लाभदायी असते.

- अंड्यातील बलकाप्रमाणे , गाजरात देखील व्हिटॅमिन ए आणि बिटा - कॅरोटीन असते. जे डोळ्यांचे रक्षण करते. डोळे कोरडे न पडण्यास मदत करते.

- संत्र्यासारख्या आंबट फळांमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. यामुळे या सारख्या फळांचा आहारात समावेश करावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT