Valentines Day 2022: Hug Day  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

जोडीदाराला द्या 20 सेकंदाची जादूची झप्पी

तुम्हाला माहित आहे का की तुमच्या जोडीदाराला 20 सेकंद मिठी मारल्याने काय होवू शकतं.

Priyanka Deshmukh
Valentines Day 2022: Hug Day

Valentines Day 2022: Hug Day फेब्रुवारी महिन्याला प्रेमाचा महिना म्हणतात. कारण याच महिन्यात व्हॅलेंटाईन वीक साजरा केला जातो. या आठवड्याच्या प्रत्येक दिवसात काहीतरी खास असते. 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी पर्यंतचा हा पुर्ण आठवडा रोज प्रेम करणाऱ्यांसाठी विशेष असतो. त्याच वेळी, या आठवड्यातील एक दिवस म्हणजे हग डे आहे. दरवर्षी 12 फेब्रुवारी रोजी हग डे साजरा केला जातो. या दिवशी प्रेम व्यक्त करण्यासाठी जोडीदाराला मिठी (Hug Day) मारल्याने तुम्हाला दिलासा मिळू शकतो. पण तुम्हाला माहित आहे का की तुमच्या जोडीदाराला 20 सेकंद मिठी मारल्याने काय होवू शकतं. मिठी मारण्याचे मानसिक, शारिरीक काय फायदे आहेत हे जाणून घेवूया...

Valentines Day 2022: Hug Day

जोडीदाराला रोज मिठी मारा- एक सुखद मिठी आपला मानसिक तणाव कमी करण्याबरोबरच आपली चिंता देखील कमी करते. जोडीदाराला 20 सेकंद मिठी मारल्याने शरीरात बरेच बदल दिसून येतात.

Valentines Day 2022: Hug Day

स्ट्रेस लेवल कमी करते- तुमच्या जोडीदाराला मिठी मारल्याने तणाव कमी होऊ शकतो. जसा तुमचा ताण कमी होतो, तसाच तुमचा मूडही ठिक होतो.

Valentines Day 2022: Hug Day

ब्लड प्रेशर कमी होते - तुम्हाला माहित आहे का की 10 मिनिटे हात धरण्यापासून ते 20 सेकंद मिठी मारण्यापर्यंत तुमच्या रक्तदाबाची पातळी लक्षणीयरीत्या कमी होते. म्हणूनच मिठी मारणे हे जितके रोमँटिक आहे तेवढेच ते हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असते.

Valentines Day 2022: Hug Day

शरीरातील वेदना कमी होतात - जर तुम्हाला कुठेतरी वेदना होत असेल तर तुमच्या जोडीदाराला मिठी मारल्याने खूप आराम मिळतो. कारण मिठी मारल्याने तुमच्या शरीरात असे हार्मोन्स तयार होतात, जे वेदना कमी करण्याचे काम करते.

Valentines Day 2022: Hug Day

भीती कमी करते - एखाद्याला मिठी मारल्याने तुमची भीती खूप कमी होते. घाबरलेल्या अवस्थेत आपण एखाद्याला मिठी मारल्यास आपल्याला दिलासा मिळतो. मनात किंवा डोक्यात सुरू असलेल्या विचारांच चक्र थांबत. आणि एखाद्या वाईट प्रसंगातून बाहेर निघण्याचा मार्ग एका मिठीतून मिळतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT