These ayurvedic herbs keep the digestive system healthy Dainik Gomantak
लाइफस्टाइल

या आयुर्वेदिक औषधी वनस्पती पचनसंस्थेला ठेवतात निरोगी

निरोगी आरोग्यासाठी पचन संस्थेचे कार्य सुरळीत चालणे आवश्यक आहे.

दैनिक गोमन्तक

दैनंदीन कामाचा ताण, धावपळीचे जीवनशैली आणि अस्वास्थ्यकर खाण्याच्या सवयी जसे की अनियमित वेळी खाणे, जास्त खाणे किंवा जाता जाता खाणे पचनसंस्थेसाठी (Digestive system) हानिकारक ठरू शकते. यामुळे एखाद्याला गॅस, सूज येणे, अपचन, ओटीपोटात दुखणे आणि अतिसार आणि इतर जठरासंबंधित समस्या यासारख्या लक्षणांचा सामना करावा लागू शकतो. निरोगी आरोग्यासाठी पचन संस्थेचे कार्य सुरळीत चालणे आवश्यक आहे. यासाठी पचन संस्था निरोगी (Healthy) ठेवण्यासाठी काही आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचा समावेश करू शकता.

* जिरे

जिऱ्याचा वापर विवध प्रकारच्या पदार्थांमध्ये चव वाढवण्यासाठी केला जातो. या व्यतिरिक्त, या बिया पाचन समस्यापासून मुक्त होण्यास मदत करतात. जिऱ्यामध्ये एंटी इंफ्लेमेटरी हे गुणधर्म असतात. यामुळे पोटाच्या समस्या कमी होतात. जिऱ्याचे पाणी साधारणपणे पाचक एन्झाईम्सच्या स्रावना उत्तेजित करते आणि पचन प्रक्रिया सुरळीत होते.

* मेथी

मेथी फायबर आणि अँटिऑक्सिडंट्सचा चांगला स्त्रोत आहे. याशिवाय मेथीचे दाणे नैसर्गिक पचन म्हणून काम करू शकतात. ते शरीरातून हानिकारक विष काढून टाकण्यास मदत करतात. मेथीचे सेवन केल्याने पोट आणि आतडे चांगले राहतात. नियमितपणे सकाळी उठून रिकाम्या पोटी मिथीचे पाणी पिल्यास वजन कमी होण्यास मदत मिळते.

* वेलची

वेलची वापर आपण अनेक पदार्थांची चव वाढवण्यासाठी करतो. तसेच वेलची पोटासंबंधित आजार दूर करण्यासाठी मदत करते. ज्या लोकांना गॅसची समस्या असते त्या लोकांनी वेलचीचे सेवन करावे.

* हळद

हळद सामान्यत: स्वयंपाकासाठी वापरली जाते. हळदीमध्ये अँएंटी-फंगल, एंटी-वायरल, एंटीऑक्सीडेंट, एंटीकार्सिनोजेनिक, एंटी-म्यूटाजेनिक, एंटीबैक्टीरियल और एंटी इंफ्लेमेटरी गुण असतात. आयुर्वेदात हळदीला खूप महत्व आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT