Exam
Exam Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Exam Phobia: परीक्षेची अवास्तव भीती वाटण्यामागे ही आहेत वैज्ञानिक कारणे

गोमन्तक डिजिटल टीम

Exam Phobia: परिक्षा म्हटलं की कमी- जास्त प्रमाणात सगळ्यांनाच भीती वाटत असते. मात्र या भीतीने मोठे स्वरुप धारण केले तर त्याचा परिणाम आपल्या परिक्षेतील कामगिरीवर होतो. महत्वाचे म्हणजे आपल्या आरोग्यावरदेखील या अवास्तव भीतीचा परिणाम होत असतो.

काहीजण परिक्षेच्या भीतीमुळे जास्त अभ्यास करतात तर काहीजण या भीतीने केलेला अभ्यास विसरतात. ही भीती तयार होते कोठुन? शरीरातील कोणते अवयव यासाठी कारणीभूत असतात ? मेंदूमध्ये कोणती केंद्रे काय काम करतात, हे संपूर्ण विज्ञान जाणून घेऊयात.

मानवाच्या मेंदूमध्ये अशी चार केंद्रे असतात जे आपले विचारांवर परिणाम करत असतात. आपल्या भावनांवर परिणाम करत असतात.

1. हायपोथॅलॅमस: हे केंद्र मेंदूच्या मध्यभागी असते. भावना समजून त्यांच्या योग्य त्या संवेदना मेंदूला आणि त्याचवेळेस अंत:स्त्राव निर्माण करणाऱ्या ग्रंथींना पोहचवते.

2. अॅमिग्लेडा: हे केंद्र भावनिक मेंदू व तार्किक मेंदूच्या मधल्या सेतूचे काम करते. पण हे केंद्र भावनिक आणि तार्किक मेंदूच्या मधल्या सेतूचे काम करते. पण हे केंद्र जास्त उत्तेजित झाले तर तार्किक विचारशक्ती बंद पडते.

3. हिप्पोकॅम्पस: पहिल्या दोन्ही केंद्रांच्या अगदी जवळ असलेले हे केंद्र आपल्या स्मरणशक्तीच्या भांडाराचे दार आहे.

4. प्री-फ्रॉन्टल कॉर्टेक्स : आपल्या कपाळाच्या मागे मेंदूच्या पुढील भागातील या केंद्रात आकलन,स्मरणशक्ती, भावनानिमंत्रण, तार्किक विचार व त्यांची मांडणी याची एकत्रित प्रक्रिया केली जाते.

कोल्ड कॉग्निशन: जेव्हा आपण निवांत अभ्यास करत असतो.तेव्हा हायपोथॅलॅमस व अॅमिग्डेला शांत असते व अभ्यास सहज होतो. याला कोल्ड कॉग्निशन म्हणतात.

अॅमिग्लेडा हायजॅक: परिक्षेच्या ताणामुळे हायपोथॅलॅमस उत्तेजित होते. त्यातून नॉरिएपिनेफ्रिन व स्टेरॉइडस् रक्तात सोडली जातात. ज्यामुळे छातीत धडधडते, हातपाय गार पडतात. त्यामुळे स्मरणशक्तीचे दरवाजे बंद होतात. या परिस्थितीत अॅमिग्लेडा मेंदूचे नियंत्रण स्वताकडे घेते, विचार करणाऱ्या मेंदूशी संपर्क तुटतो. प्रचंड ताण वाढून मेंदू ब्लॉक होतो.

हॉट कॉग्निशन: काहीजण तणावात प्रचंड शांत असल्याचे दिसून येते. हिप्पोकॅम्पस स्मरणशक्तीचे दार उघडे ठेवतात. आपल्याला तणावात जास्त चांगले काम करायचे आहे हा संदेश प्रिफॉंटल कॉर्टेक्सला पोहचतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bardez ODP Stay: बार्देशमधील पाच ‘ओडीपीं’ना स्‍थगिती; खंडपीठाचा आदेश

Loksabha Election : विकसित भारतासाठी मतदान करा! मुख्यमंत्री सावंत

Goa CM On Congress: तीन पिढ्या ‘पीएम’पद लाभूनही सामान्यांसाठी काय केले? प्रमोद सावंत यांचा सवाल

Goa Congress: भाजप सर्व आघाड्यांवर अपयशी, खलपांना लोकसभेत पाठवा; इंडिया आघाडी

Canacona: काणकोणवासीयांनी पल्लवींना पाठबळ द्यावे : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

SCROLL FOR NEXT