Canacona: काणकोणवासीयांनी पल्लवींना पाठबळ द्यावे : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

Goa Loksabha Election 2024 : भाजपच्या उमेदवार पल्लवी धेंपे यांना पाठबळ देऊन नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करावे,असे आवाहन मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी केले.
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak

Goa Loksabha Election 2024 :

काणकोण, घराणेशाहीचे उत्तम उदाहरण म्हणजे कॉंग्रेस पक्ष त्या पक्षात आजपर्यंत एकाच घराण्यातील तीन व्यक्तींनी पंतप्रधान भोगले आहे, आता कॉंग्रेस सत्तेवर आल्यास त्यांचा चौथा वारस पंतप्रधानपदी बसू पहात आहे.

मात्र, ते देशाला परवडणारे नाही. इंडिया आघाडीत सरकार सत्तेवर आल्यास पंचायतीत सरपंचपदाचा कार्यकाल जसा वाटून घेतला जातो तसे पंतप्रधान पदही वाटून घेऊन देशाचे वाटोळे करण्यात येणार आहे.

त्यासाठी काणकोणवासीयांनी भाजपच्या उमेदवार पल्लवी धेंपे यांना पाठबळ देऊन नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करावे,असे आवाहन मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी केले.

शेळी येथे इजिदोर फर्नांडिस यांनी बोलाविलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीला ते मार्गदर्शन करत होते.

CM Pramod Sawant
Goa Drug Case: पिशवीत सापडला दोन लाखांचा गांजा; तिस्क उसगाव येथे तरुणाला अटक

निवडणुकीचा सामना जिंकू ः फर्नांडिस

माझी कर्मभूमी पणजी व लोलये असल्याने पणजीत बाबा म्हणजे श्रीनिवास धेंपे हे माझे जवळचे मित्र.त्याच्या धेंपो स्पोर्ट्स मध्ये फुटबॉल खेळाडू म्हणून खेळण्याची इच्छा होती.पण, आता काणकोणात लोकसभा फुटबॉल सामना खेळण्याची संधी लाभली आहे. हा सामना नक्कीच जिंकू,असे माजी सभापती इजिदोर फर्नांडिस म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com