Vrikshasana Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Daily Yog: एकाग्रता वाढवण्यासाठी वृक्षासन करा

वृक्षासन करताना शरीराची स्थिती ही एखाद्या स्थिर वृक्षाप्रमाणे होते. म्हणूनच या आसनाला वृक्षासन असे म्हणतात.

दैनिक गोमन्तक

वृक्षासन करताना शरीराची स्थिती ही एखाद्या स्थिर वृक्षाप्रमाणे होते. म्हणूनच या आसनाला वृक्षासन असे म्हणतात. या आसनामुळे शरीर, मन प्रफुल्लित होते आणि एकाग्रता वाढण्यात मदत होते. शरीरासोबतच मानसिक समतोल राखण्यासही मदत होते. (The position of the body while doing Vrikshasana is like a stationary tree)

वृक्षासन कसे करावे?

जमिनीवर सरळ सावधान स्थितीत उभे राहा. आता उजवा पाय उचलून तो गुडघ्यात वाकवून त्या पायाचे पाऊल डाव्या मांडीच्या खाली आणि गुडघ्याच्या वर ठेवावे. अशा स्थितीत ताठ उभे राहावे. या स्थितीत डावा पाय ताठ ठेवावा आणि त्यावर शरीराचा तोल सांभाळावा. शरीर स्थिर झाल्यावर दीर्घ श्वास घेत हळूहळू दोन्ही हात डोक्यावर न्यावेत. दोन्ही हातांनी नमस्कारची मुद्रा करावी. पाठीचा कणा ताठ ठेवून श्वासावर आणि शरीराच्या स्थिरतेवर लक्ष ठेवावं. यानंतर श्वास सोडत हात खाली घ्यावेत. उजवा पाय खाली आणावा आणि आता डावा पाय उजव्या पायाच्या मांडीजवळ नेत हे आसन करावे.

वृक्षासन करण्याचे फायदे कोणते?

  1. - शरीराची स्थिरता आणि समतोल राखणारी यंत्रणा सुधारण्यास मदत करते.

  2. - एकाग्र आणि सतर्क राहण्याची वृत्ती वाढवते.

  3. - खांदे आणि पाठीच्या कण्यासाठी हे उत्तम आसन आहे.

  4. - पाय मजबूत करते आणि कमरेखालील भाग मोकळा होतो.

  5. - श्वासोच्छवासाची क्षमता वाढवते.

  6. - चेतातंतू आणि स्नायू यांच्यातील समन्वय वाढवण्यास मदत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026: आयपीएल ब्रेकिंग! मुंबई-कोलकाता सामना संपताच मूत्यू; मुंबईतील हॅाटेलमध्ये सापडला मृतदेह

Guru Gochar 2026: नशिबाचा मास्टरस्ट्रोक! 'या' 5 राशींसाठी एप्रिल महिना ठरणार 'टर्निंग पॉईंट'; धन वर्षावासह करिअरमध्ये प्रगतीची संधी

Dailyhunt आणि Josh च्या प्रगतीला नवा वेग! पी. आर. रमेश आता सांभाळणार VerSe Innovation च्या ऑडिट कमिटीची धुरा

US Iran War: 21 युद्धनौका, 3500 कमांडो, 50000 सैनिक… तरीही ट्रम्प इराणचे 440 किलो युरेनियम जप्त करु शकणार नाहीत, कारण काय?

Yellow Alert In Goa: हुश्श! गोव्याचा उकाडा कमी होणार; हवामान खात्याकडून पुढच्या 48 तासांसाठी पावसाचा अंदाज, 'यलो अलर्ट' जारी

SCROLL FOR NEXT